बेला :- बेला पोलीसांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, अवैधरित्या रेती ची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी आष्टा फाटा शिवार नागपूर चंद्रपूर रोड येथे नाकाबंदी केली असता ट्रक क्र. एम एच ४०सी एम १६१४ मिळून आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये काळी रेती आढळुन आली वाहन चालक नामे प्रशिक प्रमोद नराजे, वय २५ वर्षे, रा. बेला याला रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याबाबत सांगितले, आरोपी क्र. १) याने ट्रक मालक नामे सुमित गजानन दांडवे, वय २५ वर्ष, रा. बेला याचे सांगणेवरून नमूद वाहनामध्ये अवैधरित्या काळी रेती भरून वाहून नेत असल्याची माहीती पोलीसांना प्राप्त झाली पोलीसांनी पंचासमक्ष १) ट्रक क्र. एम एच ४०सी एम १६१४ किमती २५,००,०००/- रूपये आणि २) ०३ ब्रास काळी रेती किंमती १५,०००/- रूपये आणि असा एकुण २५.१५,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नमुद आरोपी वाहन चालक व मालक याच्या विरूध्द पोस्टे बेला येथे कलम ३०३(२) भा.न्या.सं सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








