spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

व्यवस्था परिवर्तन साठी रिपब्लिकन लोकशाही मोर्चा मैदानात – प्रा रमेश पिशे

– कामठी येथे रिपब्लिकन लोकशाही मोर्चा पुरस्कृत निवडणूक कार्यालयाचे उदघाटन

– कामठीच्या नगराध्यक्ष पदासाठी राजकुमार रामटेके यांच्या नावाची घोषणा

कामठी :- देशात एका विशिष्ट वर्गाचे प्राबल्य वाढले असून धर्माच्या व जातीच्या नावावर ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्यांकावर सातत्याने अन्याय होत आहे. नागरिकांचे मूलभूत अधिकार प्राप्त करण्यासाठी रिपब्लिकन लोकशाही मोर्चा निवडणूकीच्या मैदानात उतरला आहे असे वक्तव्य प्रा रमेश पिशे यांनी रिपब्लिकन लोकशाही आघाडी पुरस्कृत कामठी नगर विकास कृती समिती निवडणूक कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले, कार्यालयाचे उदघाट्न जेष्ठ आंबेडकरी विचारक जनार्दन मुन यांचे हस्ते व कामगार नेते अरुण गाडे, आदिवासी एम्प्लॉईज फेडेरेशन चे प्रा मधुकर उईके,राष्ट्रीय आंबेडकरी प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे, सिटूचे काम्रेड राजेंद्र साठे,संभाजी ब्रिग्रेडचे प्रताप पटले,काष्ट्राइब शिक्षक संघटनेचे प्रा एम एस वानखेडे, कामगार नेते श्यामराव हाडके, रवि पोथारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अरुण गाडे यांनी रिपब्लिकन लोकशाही मोर्चाची भूमिका मांडताना रिपब्लिकन म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता न्यायावर आधारित लोकशाही मूल्य जपणारी वंचित शोषित समाजाचे न्याय हक्क प्राप्त करणारी विचारधारा आहे.

म्हणूनच ही विचारधारा रुजविण्यासाठी रिपब्लिकन लोकशाही मोर्चा गठीत करण्यात आला असून जनतेने साथ द्यावी असे आवाहन केले तसेंच बुद्धभूमी कामठीचे आणि वडसा येथिल प्रेरणा भूमिचे संयोजक व सामाजिक कार्यकर्ता मा राजकुमार रामटेके यांच्या कामठी नागराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून अरुण गाडे यांनी घोषणा केली व त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचे त्यांनी आवाहन केले.

याप्रसंगी अनिरुद्ध शेवाळे, प्रताप पटले, प्रा एम एस वानखेडे, श्यामराव हाडके यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाला कामठी नगर विकास कृती समिती सदस्य इलियास भाई, गणेश आगाशे, आरजू कांबळे, रविजय नागराले, भीमराव वाघमारे इत्यादि।उपस्थिति उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन व भूमिका राजकुमार रामटेके यांनी मांडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.