नाग नागिनसह तिच्या एकेविस पिल्लांचे रेस्क्यु

0
180
रामटेक  १८ -:  रामटेक वनपरिक्षेत्रातील चाचेर गावातील शेतकरी नितेश ठोसरे यांच्या शेतातून एक नाग नागिन चा जोडा व त्यांची २१ पिल्ले पकडण्यात आली त्यांना रामटेक वन कार्यालयात आणण्यात आले आणि पंचनामा केल्यानंतर त्यांना चोरबाहुली जंगलात सोडण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की नितेश ठोसरे हे त्यांच्या शेतात काम करत होते. त्यावेळी शेतातील एका झोपडीत औषधांच्या काही बोऱ्या ठेवल्या होत्या. त्या बोऱ्या उचलत असताना त्याना एक साप दिसुन आला. तो साप पाहिल्यानंतर त्या सापाला पकडण्यासाठी वाइल्ड चॅलेंजरचे सर्पमित्र ऋषी बावणे याला बोलावण्यात आले. सर्पमित्रांनी एका सापाला पकडले व तो पकडल्यानंतर त्याच ठिकाणी दुसरा साप सुद्धा आढळून आला. त्या सापाला सुद्धा सुखरूप पकडून प्लास्टिकच्या भरणीमध्ये बंद करण्यात आले. आनखी काही बोऱ्या काढल्यानंतर सापाची पिल्ले दिसली. हे पिल्ले एक किंवा दोन नव्हे तर तब्बल २१ पिल्ले होती. त्यांनाही तेथुन काढण्यात आले. सापाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात पिल्ले पाहून शेतकरी भयभीत झाले. यानंतर सर्पमित्रांनी साप व त्यांच्या पिल्लांना पकडल्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला व सर्पमित्रांचे आभार मानले . सर्पमित्रांनी त्या नाग नागिन व त्यांच्या २१ पिल्लांना रामटेक वनविभागात आणले आणि रामटेक वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. यानंतर वाइल्ड चॅलेंजर ऑगनायझेशन चे सर्पमित्र अजय मेहरकुळे, सागर घावडे, ऋषी बावणे, लकी मरस्कोल्हे यांनी त्या नाग नगिन व त्यांच्या पिल्लांना चोरबाहुली जंगलात नेऊन सोडले.