– वाघाये महाविद्यालय लाखनी येथे संशोधन पद्धती व प्रकल्पावर विशेष सेमिनार संपन्न
हंसराज,प्रतिनिधी भंडारा लाखनी :- संशोधनाची ध्येय-उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वापरली जाणारी पद्धतशीर, तार्किक आणि वैज्ञानिक प्रक्रिया म्हणजेच ‘रिसर्च मेथडालॉजी’ होय. विद्यार्थ्यांनी केवळ माहिती गोळा न करता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून संशोधन क्षेत्रात कार्य करणे काळाची गरज आहे, असे मत नागपूर येथील धोटेबंधू समाजकार्य महाविद्यालयाच्या डॉ. आरती पडोळे यांनी व्यक्त केले.
स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय, लाखनी येथील समाजशास्त्र विभागाच्या वतीने ‘रिसर्च मेथडालॉजी व रिसर्च प्रोजेक्ट’ (संशोधन पद्धती व संशोधन प्रकल्प) या विषयावर एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, रिसर्च स्कॉलर आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी नागपूर येथील डॉ. नितीन कायरकर यांनी ‘रिसर्च प्रोजेक्ट’वर सविस्तर मार्गदर्शन केले. संशोधनातील विषय निवड, उद्दिष्टे निश्चित करणे, डेटा संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष काढणे या टप्प्यांची त्यांनी माहिती दिली. तसेच प्रकल्प लेखनाची योग्य पद्धत आणि सादरीकरण कौशल्ये कशी विकसित करावीत, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांनी विद्यार्थ्यांना ‘रिसर्च पेपर’ तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी रिसर्च पेपरची रचना (Abstract, Introduction, Methodology, Results, Conclusion) समजावून सांगितली. संशोधनात प्रामाणिकपणा (Ethics) आणि साहित्याचे सर्वेक्षण (Literature Review) किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. तसेच संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या विविध डिजिटल साधनांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा कार्यशाळेच्या आयोजक डॉ. अनुराधा खाडे यांनी केले. आभार प्रदर्शन वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रा. श्रद्धा बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर शेंडे, डॉ. मनमोहन भैसारे, प्रा. रूपचंद डोंगरवार, डॉ. चंद्रशेखर देवघरे, डॉ. पुण्यशील टेंभुर्णे, प्रा. तुषार डोंगरवार, डॉ. ढोंगे, डॉ. धर्मेंद्र सिंह, डॉ. गीता टीचकुले, प्रा. वलथरे, प्रा. प्रमोद भोयर, डॉ. मंगेश वंजारी, डॉ. सुधीर सहारे आणि प्रा. सागर वारंगणे यांनी परिश्रम घेतले. तसेच विशाल हणवतकर, विजय शहारे, पिंटू हलमारे आणि कुंबरे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून फीडबॅक फॉर्म भरून घेण्यात आले आणि सर्वांना ई-प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेत नक्कीच वाढ होईल, असा विश्वास महाविद्यालयाने व्यक्त केला आहे.




