spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वातंत्रता संग्राम सैनिक, लाल सेना, शहीद स्मारक उभारण्याच्या संकल्प – नगराध्यक्ष पियुष बुरडे

– बाबूलालजी गुप्ता यांची जयंती साजरी

खापा :- महाराष्ट्राचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, हिंदुस्थानी लाल सेनेचे सहयोगी संस्थापक बाबुलालजी गुप्ता यांची १२२ वी जयंती १ जानेवारी गुरुवारी मोठ्या उत्साहात व आदरांजली वाहत साजरी करण्यात आली. खापा शहरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते संजय गुप्ता, मकसूद शेख, रितेश गुप्ता यांच्या पुढाकाराने हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच बाबुलालजी गुप्ता यांच्या फोटोला पुष्पहार घालून व पुष्प अर्पण करून सर्व उपस्थित मान्यवरांतर्फे अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नवनियुक्त नगराध्यक्ष पियूष बुरडे, खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे आणि नवनियुक्त सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

यानिमित्ताने बाबूलालजी गुप्ता यांचे नातू संजय गुप्ता, ठाणेदार किशोर भुजाडे, माजी नगरसेवक राजेशचंद्र बुरडे, नगराध्यक्ष पियुष बुरडे, माजी नगरसेवक सुरेश चंद्रवंशी आदींनी हिंदुस्तानी लाल सेना, शहरातील सर्व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी यांच्या बलिदानाच्या इतिहासावर प्रकाश टाकला.

या निमित्ताने नवनियुक्त नगराध्यक्ष पियुष बुरडे यांनी खापा शहरात होऊन गेलेले स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, हिंदुस्तानी लाल सेनेचे सैनिक, तसेच स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेले शहीद मजीद खा पहेलवान, शहीद जानराव शेलुकर गुरुजी यांच्या इतिहासाला अजरामर ठेवण्याकरिता नागपूर शहरात बजेरिया येथे नुकताच स्थापित झालेले वंदे मातरम उद्यानाच्या पार्श्वभूमीवर खापा शहरातील अशाच प्रकारचे एक उद्यान स्थापित करण्याचे आश्वासन दिले.

खापा नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर, खापा शहराने एक अनोखा उपक्रम हाती घेतला, ज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि नगराध्यक्ष यांनी शहरातील महान क्रांतिकारी स्वातंत्र्य संग्राम सैनिक बाबुलालजी गुप्ता यांच्या जयंतीदिनी एकाच व्यासपीठावर एकत्रित येऊन आणि गुप्ताजी यांच्या तैलचित्राजवळ वंदे मातरमचा जयघोष करून खापा शहराचा चहुमुखी विकास व बाबुलालजी गुप्ता यांच्यासह स्वतंत्राच्या लढ्यात सहभागी असलेल्या हिंदुस्थानी लाल सेनेच्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे भव्य स्मारक उभारण्याचा एकमताने संकल्प केला.

यावेळी नवनियुक सत्ताधारी आणि विपक्षिय नगरसेवक, नगरसेविका गणेश आके, वैशाली लिखार, संजय सोनकुसळे, मनोरमा श्रीयाम, किशोर आष्टनकर, कविता धराडे, मिलिंद बुरडे, अंजली मेनकुदळे, प्रशांत तुमाने, सुनील पाहुणे, निखिल आष्टनकर, निशा कठौते, रवी परतेती, रोशनी डेरे, माजी नगरसेवक नारायण लांबट, सुरेश चंद्रवंशी, सामाजिक कार्यकर्ते खेमराज बारापात्रे, रवींद्र कवडे, मुकेश पावडे, सुनील भगत, आशिष कुंभारे, राजेश गुप्ता, विरेंद्र तातेड, ऋषिकेश बावनकुळे, सारंग आवते, अनिल मेनकुदळे, रमेश लष्करे, बाबूभाई पटेल यांच्यासह शहरातील शहरातील माजी नगरसेवक, नगरसेविका, प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सर्वपक्षीय नेते मंडळी, महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन मकसूद शेख यांनी केले. तर उपस्थितांचे आभार रितेश गुप्ता यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.