कोदेगाव ग्रा.पं.च्या वृक्षलागवड मोहिमेस प्रतिसाद

0
74

खापा, १७ :  पर्यावरण रक्षण व हरित समतोल टिकवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत कोदेगाव येथे वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग व ग्रामपंचायतीच्या कुशल नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. ही मोहीम सोमवारी (ता.14) सरपंच संगीता उइके, उपसरपंच प्रफुल ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये ग्रा.पं. सदस्य संदीप चोरे, कैलास पोटोडे, संगीता ठाकरे मंदा मानकर, मीनाक्षी गणवीर, वर्षा उइके, ग्राम सचिव खंडाळे मॅडम, शिक्षिका येवले मॅडम, अंगणवाडी सेविका प्रेमीला ठाकरे, जागेश्वरी चोरे आणि इतर नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत कर्मचारी चिंतामण राऊत, मनोज बावणे, तेजस गिरी यांच्या सहकार्याने करण्यात आले. गावातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला वृक्षरोपण करण्यात आले. रोपांची निगा राखण्याची जबाबदारी स्थानिक शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडे सोपविण्यात आली आहे