नागपूर १७ ; 15 जुलै 2025 रोजी ताजबाग परिसरातील 103व्या मोठा ताजबाग उर्स निमित्ताने नियोजित धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलीस तर्फे व्यापक बंदोबस्ताची आखणी करण्यात आली. या बंदोबस्त संदर्भात मा. पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल नागपूर शहर यांनी बंदोबस्तातील अधिकारी व अमलदार यांना ब्रिफिंग देऊन मार्गदर्शन केले.यामध्ये परिमंडळ क्र 4 चे पोलीस उपायुक्त, परिमंडळ निहाय सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच नागपूर शहरातील सुमारे 500 अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांनी आपल्या सूचनांमध्ये महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. ताजबाग येथील उर्स हा नागपूर शहरातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा धार्मिक बंदोबस्त आहे. या कार्यक्रमासाठी केवळ नागपूर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून तसेच विदर्भ व इतर राज्यांतील श्रद्धाळू मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. त्यामुळे हा बंदोबस्त महत्वपूर्ण आहे. बंदोबस्तामध्ये प्रेशर पॉइंट्स, बीडीएस पथक, जत्रेतील झुला, खेळ व मनोरंजनासाठी लावलेले स्टॉल्स यांचे बंदोबस्त नियोजन केले आहे. जनरेटर, विद्युत पुरवठा, गर्दीचे टप्पे यावर विशेष लक्ष देत आहे. गर्दी व्यवस्थापन बाबत महत्वपूर्ण सूचना अधिकारी अंमलदार यांना देऊन, बंदोबस्ताच्या प्रत्येक पॉइंटवर नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.18 तारखेला होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाची पूर्वतयारी,22 तारखेला होणाऱ्या मुख्य बंदोबस्तासाठी रात्रीपासूनच नियोजन, स्केलेटन बंदोबस्त,वाहनांची व्यवस्था, पार्किंगचे ठिकाण, क्रिटिकल पॉइंट्स, होल्डिंग एरियाज, एन्ट्री-एग्झिट पॉइंट्स व आपत्कालीन सुविधा यांचे स्पष्ट नियोजन व माहिती,जत्रेदरम्यान भाविक यांचे वॉलंटिअर मार्फत योग्य व्यवस्थापन ,
बीडीएस व डॉग स्कॉड,सीसीटीव्ही किंवा व्हिज्युअल ट्रॅकिंग युनिट ,संशयितांची ओळख ,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर आधीपासूनच नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन पोलिस आयुक्त यांनी यावेळी मार्गदर्शन दरम्यान केले.
बंदोबस्ताचे स्वरूप: बंदोबस्त दिवस व रात्रपाळी मध्ये सेक्टरनिहाय विभागण्यात आला आहे. मुख्य बंदोबस्त क्षेत्रात दर्ग्याच्या आतील परिसर,दर्ग्याच्या बाहेरील परिसर, डोम व वाय पॉइंट ते बुलेट गेट परिसर, वाय पॉइंट ते शहंशहा चौक परिसर, याशिवाय छोटा ताजबाग व हुसेन बाबा दर्गा या परिसरातही स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.नियंत्रण कक्ष ‘मोठा ताजबाग’ येथे उभारण्यात येणार असून, सर्व बंदोबस्त याठिकाणावरून समन्वयित केला जाणार आहे.बंदोबस्तात सर्व्हेलन्स वाहने,पोलीस स्टेशन पेट्रोलिंग युनिट, तसेच आपत्कालीन मार्गावरील तैनाती यांचाही समावेश आहे. बंदोबस्तात एकूण 9 पोलीस निरीक्षक,70 सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, 500 पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सदर ब्रीफिंगl दरम्यान डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग), पोलीस उपायुक्त रश्मीता राव, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव विशेष शाखा,सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे, सुधीर नंदनवार, विशाल शिरसागर, सतीश गुरव, माधुरी बाविस्कर, तसेच सकरदरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे आदी अधिकारी उपस्थित होते.




