spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वाहन चोरी प्रकरण उघडकीस; तीन दुचाकींसह चोर अटकेत – तहसील पोलिसांची कारवाई

 

नागपूर १७ : नागपूर शहरातील तहसील पोलिसांनी वाहन चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत एक वाहन चोर गजाआड केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एकूण तीन चोरलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी नेहमी गर्दीच्या ठिकाणी वाहनांची चोरी करत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गाडी चोरीची तक्रार मेयो रुग्णालयाजवळ
१३ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास शोएब खान अमानउल्ला खान यांनी त्यांच्या मोटारसायकलची मेयो हॉस्पिटलच्या आयसीयू बिल्डिंगजवळ पार्किंगमध्ये चोरी झाल्याची तक्रार तहसील पोलिस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गस्तीत संशयितावर पोलिसांची करडी नजर
गुन्ह्याच्या तपासादरम्यान, तहसील पोलीस गस्त घालत असताना लाल इमली चौकात एक तरुण चोरीची दुचाकी चालवताना संशयास्पद स्थितीत आढळला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले.

चोर सावनेरचा निघाला; तीन गाड्यांची कबुली
पोलिसी चौकशीत त्याने आपले नाव नीलेश अशोक कन्हेरे (रा. सावनेर) असे सांगितले. अधिक तपासात आरोपीने फक्त एक नव्हे तर तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या मिळालेल्या माहितीनुसार सर्व तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

तहसील पोलिस ठाण्याच्या या वेळी केलेल्या तत्पर कारवाईमुळे वाहन चोरट्याला पकडण्यात यश आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles