spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोलीस अधिक्षक कार्यालयात सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा सत्कार समारंभ.

 

नागपूर 1 : पोलीस अधिक्षक कार्यालय, नागपूर ग्रामीण येथील पोलीस भवनात दिनांक ३० जून २०२५ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व अंमलदारांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक  रमेश धुमाळ यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सत्कारप्राप्त अधिकारी व अंमलदारांमध्ये पोउपनि दिलीप पुसाराम बासोडे (नियंत्रण कक्ष), पोउपनि गजानन दशरथ कंगाले (पोलीस स्टेशन काटोल), श्रेणी पोउपनि उत्तम कन्हैयालाल दास व अशोक ओंकार धांडे (मोटर परिवहन विभाग), देवा लक्ष्मण नागोसे (पोलीस स्टेशन मैदा), सहायक फौजदार ओंकार नथ्थुजी डाहारे (पोलीस स्टेशन कुही), दिलीप घनश्याम सुर्यवंशी (पोलीस स्टेशन उमरेड), व श्याम बिरबलदास महंत (नियंत्रण कक्ष) यांचा समावेश होता. कार्यक्रमात  धुमाळ यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या यशस्वी सेवेसाठी शुभेच्छा देत पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि सुखद आयुष्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी मानव संसाधन शाखेच्या पोउनि  जोत्स्ना गिरी तसेच शाखेचे अंमलदार उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.