spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माणव-वन्यजिव संघर्ष टाळण्यासाठी ग्रामस्थांना सुरक्षिततेचे धडे

– वनपरीक्षेत्र कार्यालय पवनी (प्रादेशिक) चा अभिनव उपक्रम

– कार्यक्रमाला विविध राजकियांसह पोलिस पाटलांची उपस्थिती

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- जंगल व जंगली प्राण्यांचे संवर्धन करत असताना मानवाला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षात मानव-वन्यजीव संघर्ष (Man-Wildlife Conflict) टोकाला गेला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शेतात काम करणारे लोकं आणि गुराखी, तसेच पाळीव प्राण्यावर वाघांच्या, बिबट हल्ल्यात बळी पडत असल्याचे चित्र आहे. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनपरिक्षेत्र कार्यालय, पवनी (प्रादेशिक) तर्फे डॉ. विनिता व्यास, उपवनसंरक्षक नागपुर वनविभाग नागपुर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गोंविदा लुचे, सहाय्यक वनसंरक्षक, रामटेक यांच्या प्रेरणेने समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत ग्रामस्थांना वन्य प्राण्यांपासून बचावासाठी सुरक्षिततेचे धडे देण्यात आले. सभेमध्ये पवनी (प्रा.) वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या गावातील जनप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सरपंच, उपसरपंच आणि सर्व पोलिस पाटिल सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.सभेत शांताताई कुंभरे, माजी जि. प. सदस्य, हरिष उईके, माजी जि. प. सदस्य, संजय नेवारे, माजी पं. स. सभापती, चंद्रकांत कोडवते, माजी पं. स. सभापती, पवनी (प्रा.) वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या गावातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटिल, रमेश चाके, क्षेत्रसहाय्यक सालई, विनोद कोल्हे, क्षेत्र सहाय्यक हिवरा, सुनिल गुर्वे, क्षेत्र सहाय्यक चोरबाहुली, विठ्ठल सोडगीर, वनरक्षक तुमडीटोला, विनोद टेकाम, श्रीराम तिवारी, गुलाब मर्सकोल्हे आदी उपस्थित होते. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता मागील एक वर्षात पवनी (प्रा.) वनपरिक्षेत्राव्दारे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची तथा कामाची माहिती जसे प्रोजेक्टरव्दारे गावात दाखविण्यात आलेले जनजागृतीचे व्हिडिओ, गावात घेण्यात आलेल्या सभा, जंगलात व गावालगतच्या क्षेत्रात करण्यात आलेली पायदळ गस्त याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मणुष्य हानी, मणुष्य जख्मी, पशुधन हाणी व शेतपीक नुकसानी प्रकरणाची लवकरात लवकर निकाली काढल्याबाबत चर्चा करण्यात आली. प्राथमिक प्रतिसाद दल (पीआरटी) यांचाव्दारे करण्यात येणाऱ्या विविध कामाची माहिती देण्यात आली, जंगलात जातांना घ्यावयाची काळजी जसे भोंगाच्या वापर करणे, एकटे न जाता समूहाने जाणे, सकाळी व सायंकाळी वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीच्या वेळेवर जंगलात न जाणे, शेतीचे कामे करतांना जास्त वेळ खाली वाकून काम न करणे, आवश्यक असल्यास एक व्यक्ती आजुबाजुचा परिसर पाहणी करण्यासाठी सोबत घेवून जाणे ईत्यादी सुचना देण्यात आल्या. सोबतच वनपरिक्षेत्रातंर्गत करण्यात आलेल्या जंगलातील लेंटेना निमुर्लनाची तसेच रोड लगतचे झाड झुडपांची छटाई करण्याच्या कामाची माहिती देण्यात आली. स्वयंम रोजगार मिळण्याकरिता लोकांना प्रेरित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

कामाची माहिती (पीपीटी) व्दारे सादर

सागर बनसोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, पवनी (प्रा.) यांनी सभेत उपस्थित मान्यवरासमोर वरील सर्व कामाची माहिती (पीपीटी) व्दारे सादर केले. त्यानंतर पवनी येथील मशरुम उत्पादन केंद्राला सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन वन विभागाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. उपस्थित मान्यवरासोबत सकारात्मक चर्चा करुन त्यांच्या प्रश्नांचे समाधान करुन जागृत राहण्याची विनंती करण्यात आली.

Popular Articles