spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजेश एस. चौधरी, उपसंचालक, NDRF अकॅडमी यांचा सेवानिवृत्तीनंतर राष्ट्रसेवेतील प्रदीर्घ कार्याला सलाम.

 

नागपूर 1 – NDRF अकॅडमी, नागपूर येथील उपसंचालक राजेश एस. चौधरी यांनी अग्निसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व नागरी संरक्षण प्रशिक्षण क्षेत्रातील साडेतीन दशकांहून अधिक प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेनंतर नुकतीच सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल संपूर्ण अकॅडमीने त्यांचा सन्मानपूर्वक निरोप घेतला.

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथील माजी विद्यार्थी असलेल्या चौधरी यांनी B.Sc., B.E. (Fire), औद्योगिक सुरक्षा क्षेत्रातील प्रगत डिप्लोमा, आणि फायर अँड लाईफ सेफ्टी ऑडिटमधील पदवोत्तर डिप्लोमा प्राप्त केले आहे. त्यांनी आपली कारकीर्द १९८९ मध्ये भाभा अणु संशोधन केंद्र, म्हैसूर येथे सुरू केली आणि १९९३ मध्ये UPSC निवडीतून नॅशनल सिव्हिल डिफेन्स कॉलेज (सध्याचे NDRF अकॅडमी) येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

आपत्ती व्यवस्थापन, अग्निसुरक्षा, शोध व बचाव कार्य तसेच धोकादायक रसायन व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी विशेष योगदान दिले आहे. बँकॉक, अमेरिका आणि सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांत भारताचे प्रतिनिधित्व केले असून भंडारा व विशाखापट्टणम बंदरातील मोठ्या अग्निकांडांच्या तपास समित्यांवरही ते सदस्य होते.

त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत राष्ट्रपतींकडून नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेसाठी “Meritorious” व “Distinguished” अशा दोन्ही सन्मानचिन्हांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

डॉ. हरिओम गांधी, DIG/संचालक,  मसूद मोहम्मद, कमांडंट,  मनीष रंजन, कमांडंट,  पंकज कुमार, कमांडंट, आणि सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने  चौधरी यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्यांच्या पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Popular Articles