– संपूर्ण महाराष्ट्रात सनातन शक्ती संघाचा भव्य विस्तार
– सेवा, धर्मरक्षण आणि राष्ट्रनिर्मितीचा दृढ संकल्प – नव्या नियुक्त्यांची घोषणा
नागपूर :- सनातन शक्ती संघ (भारत) चे राष्ट्रीय अध्यक्ष के.डी.सुभाष यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनात महाराष्ट्रात संघटनेच्या कार्याचा वेगाने विस्तार करत समाजहित, धर्मरक्षण व राष्ट्र निर्मितीसाठी व्यापक उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. संघटनेतर्फे ठामपणे सांगण्यात आले की, हि केवळ योजना नसून आम्ही शपथ घेतली आहे की, त्या प्रत्येक उपक्रमाची अंमलबजावणी, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि पूर्ण समर्पणाने प्रत्यक्षात केली जाईल.
प्रमुख उपक्रम:
महाराष्ट्रातील क्षेत्रांमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
•गोरक्षण व संवर्धन अभियान
•सनातन बोर्ड स्थापन करण्याची मागणी
•वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण
•धार्मिक संस्थांचा विकास
•भारतीय संस्कृती व आरोग्याबाबत जनजागृती
•गरजू व दुर्बल घटकांना मदत
•युवकांना सनातन धर्माशी जोडणे
•स्वच्छता अभियान व आरोग्य शिबिरे
•सामाजिक कुरीतींविरुद्ध जनजागृती (जातीवाद, भेदभाव, अंधश्रद्धा)
•स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन
•महिला सक्षमीकरण
(शिक्षण व रोजगार)
•पाणी व वीज बचत अभियान
•योग, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
•संस्कृत शिक्षण व गुरुकुल पद्धतीचे पुनरुज्जीवन
•गरजू मुलींच्या विवाहासाठी सहाय्य
महत्त्वाच्या नियुक्त्या
रॉकी महाजन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, प्रणय शेलोट महाराष्ट्र राज्य विधिक सल्लागार नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष रॉकी महाजन यांनी सांगितले की, ही जबाबदारी त्यांच्या दृष्टीने सन्मानासोबतच मोठे कर्तव्य असून, ते संघटनेची विचारधारा, धर्मरक्षण व समाजसेवा यांना सर्वोच्च प्राधान्य देत कार्य करतील. तसेच विधिक सल्लागार म्हणून नियुक्त प्रणय शेलोट संघटनेला कायदेशीर बळकटी देत न्यायसंगत कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिक, युवक व समाजसेवकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी या धर्मरक्षण व राष्ट्रनिर्मितीच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून संघटनेला बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.