Saturday, April 18, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संगीता भोयर यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी निवड

– उपसभापतीपदी सईदाबी ताजू शेख यांची निवड

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती,उपसभापती तसेच झोन क्र. १, २ व ३ सभापती पदाची निवड करण्यासाठी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या कालावधीत पार पडलेल्या विशेष सभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संगीता मंगल भोयर यांची महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणुन तर तर उपसभापतीपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्याच सईदाबी ताजू शेख यांची निवड करण्यात आली.

महिला व बालकल्याण समितीच्या १२ सदस्यांपैकी १ सदस्य अनुपस्थित असल्याने ११ सदस्यांनी हात उंचावुन केलेल्या मतदानात सभापती,उपसभापती यांची निवड करण्यात आली.तसेच प्रत्येक झोनच्या प्रभागातील नगरसेवक यांनी त्या झोनसाठी हात उंचावुन मतदान केले. यात प्रभाग समिती क्र. १ च्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे रवि वामनराव लोणकर, प्रभाग समिती क्र. २ च्या सभापतीपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वैशाली प्रकाश चंदनखेडे तर प्रभाग समिती क्र. ३ च्या सभापतीपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रामनरेश कुंवरलाल यादव यांची निवड जाहीर करण्यात आली.

नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे महानगरपालिकेच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सदर सभा जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयुक्त अकुनुरी नरेश,उपायुक्त शेषराव टाले,उपायुक्त संदीप चिद्रवार, मनपा अधिकारी कर्मचारी व सदस्य उपस्थीत होते. निवडीनंतर जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com