Home Latest News नाशिकमध्ये उमेदवार देऊ न शकणाऱ्या संजय राऊतांनी नेतृत्वाचे धडे देऊ नयेत

नाशिकमध्ये उमेदवार देऊ न शकणाऱ्या संजय राऊतांनी नेतृत्वाचे धडे देऊ नयेत

0

<p><strong>&&num;8211&semi; भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा प्रहार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>महाविकास आघाडी राज्यातील 16 महापालिकांमध्ये निवडणूक लढविण्याची भाषा करत असताना नाशिकची जबाबदारी असलेले संजय राऊत यांनी तिथे निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली आहे&period; नाशिक जिल्ह्यात पक्षाचा उमेदवार देऊ न शकणाऱ्या राऊतांनी नेतृत्वाचे धडे देऊ नयेत&comma; अशी घणाघाती टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केली&period; संजय राऊत हात लावतात तिथे राजकीय कोळसा होतो हे माहीत झाल्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे राऊत यांना बाजूला सारत आहेत&comma; असेही बन म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>नाशिकमध्ये उमेदवारी न देण्यामागे कोणता घोडेबाजार किंवा व्यवहार झाला का&comma; याचे उत्तर राऊतांनी जनतेसमोर द्यावे&comma; असे म्हणत बन यांनी शेतकरी प्रश्नावरूनही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला&period; ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ पूर्णपणे मिळाला नाही&period; शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम ठाकरे सरकारने केले&period; मात्र महायुती सरकारने कोणतीही निवडणूक नसताना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचे काम केले&period; फसव्या योजना भाजपा किंवा महायुतीच्या नसून त्या ठाकरे आणि राऊत यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या गेल्या&period; महायुती शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असून दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल&comma; असेही त्यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुती एकसंघ आहे&period; महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवतील आणि सर्व 17 जागांवर विजय मिळवतील&comma; असा विश्वास बन यांनी व्यक्त केला&period; विधानसभा&comma; लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणेच विधान परिषद निवडणूक समन्वयाने लढण्याचा निर्णय महायुतीकडून घेण्यात आला आहे&period; राज्यातील जनतेचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधींचा पाठिंबा महायुतीला मिळत असल्यामुळे या निवडणुकीतही निश्चितच मोठे यश मिळेल&comma; असे बन यांनी ठणकावून सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या काँग्रेसच्या कारकिर्दीत झाल्या असल्याचे सांगत काँग्रेसला शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही&period; शेतकऱ्यांना आश्वासने देऊन त्यांची फसवणूक करण्याचे काम काँग्रेसने सातत्याने केले असून फसवाफसवी हा काँग्रेसचा जुना राजकीय धंदा असल्याची टीका बन यांनी केली&period; महायुती सरकार शेतकरीहिताचे निर्णय घेत असून काँग्रेसने आधी आपल्या कारकिर्दीचा हिशेब द्यावा&comma; अशीही मागणी त्यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version