spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संजय झोटिंग यांची रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड

पांढरकवडा :- येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळ व कार्यकारी मंडळ समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संजय झोटिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली सातुरवार यांच्या हस्ते झोटिंग यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले.

संजय झोटिंग हे तालुक्यात निष्ठावंत रुग्णसेवक म्हणून ओळखले जातात. टायगर फोर्सचे ते सक्रिय सदस्य असून, दिनदुबळ्या आणि गरजू रुग्णांची सेवा करण्यात ते नेहमीच अग्रेसर राहतात. महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीची मदत असो अथवा लावारिस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे सेवाकार्य असो, झोटिंग सदैव तत्पर असतात. त्यांनी आजवर विविध आरोग्य शिबिरांचेही यशस्वी आयोजन केले आहे.

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयी-सुविधांनी युक्त दर्जेदार आरोग्य सेवा रुग्णांना मिळावी, यासाठी त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि परिणामकारक आंदोलने केली आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण समाजहिताच्या आणि रुग्णसेवेच्या कार्याची दखल घेऊन रुग्ण कल्याण समितीवर त्यांची निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन व स्वागत होत आहे.

Popular Articles