सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रामटेक येथील सहाय्यक शिक्षक संजीव दर्यापूरकर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण मंडळाचे सचिव मयंक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्राचार्य रवींद्र चन्ने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याबद्दल शाळेतर्फे यांच्या शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ३७ वर्षे ४ महिन्यांच्या सेवाकाळातील अनुभव व्यक्त करताना दर्यापूरकर म्हणाले, विद्यार्थ्यांना शिकवतांना स्वतःलाही खूप काही शिकायला मिळाले. संस्थेतील सर्वांचे सहकार्य लाभले. अध्यक्षस्थानावरून बोलताना सचिव मयंक देशमुख म्हणाले की, दर्यापूरकर सरांच्या प्रामाणिक सेवेमुळे अनेक सगुणी विद्यार्थी घडले. शाळेत शिकवतांना संस्थेतील सर्वांचे सहकार्य लाभले. उपस्थिताकड़ून त्यांचा कार्याची प्रशंसा करण्यात आली. याप्रसंगी जुण्या आठवणींना उजाळा देऊन त्यांची वाहवा केली. कार्यक्रमाला संचालक मंडळातील सदस्य होमराज हजारे, घनश्याम बर्वे, आशीष थोटे, मनीषा दर्यापूरकर, पर्यवेक्षक शैलेश परमार, मुख्याध्यापक नीलेश टोंगसे, प्राचार्य राजू बर्वे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मून, जांभुळकर, राधेश्याम गायधने, अशोक हटवार, भालचंद्र भडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना सचिव मयंक देशमुख म्हणाले की, दर्यापूरकर सरांच्या प्रामाणिक सेवेमुळे अनेक सगुणी विद्यार्थी घडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. संचालन प्रा. श्रीकांत येरपुडे, प्रास्ताविक वेदप्रकाश मोकद्दम आणि आभार प्रदर्शन अरविंद कोहळे यांनी केले.
संजीव दर्यापूरकर यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



