सावनेर ३ : आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सावनेर पोलिस स्टेशन अंतर्गत २ सप्टेंबर रोजी भव्य रूट मार्च काढण्यात आला.
हा रूट मार्च गांधी चौक, गडकरी चौक, जयस्तंभ चौक, होळी चौक, कारोकार चौक, मुरलीधर मंदिर, जामा मस्जिद, मडकी चौक मार्गे पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आला.
या रूट मार्चमध्ये सागर खर्डे, सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर उपविभाग, संपत खलाटे, उपविभागीय दंडाधिकारी सावनेर, सुमेध अलोने, मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन सावनेर यांच्यासह पोलीस स्टेशन सावनेर, कळमेश्वर, खापा व केळवद येथील अधिकारी-अंमलदार सहभागी झाले होते.
रूट मार्चमध्ये एकूण १३ अधिकारी, १ एसआरपीएफ पथक, १ आरसीपी पथक, १०१ अंमलदार आणि २६ गृहरक्षक उपस्थित होते.




