spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सरदार @150 युनिटी मार्च’ पदयात्रेचे आयोजन

यवतमाळ :- मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यवतमाळ जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे लोह पुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वा. ‘सरदार @150 युनिटी मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे.

सदर पदयात्रा अमोलकचंद महाविद्यालय गोधणी रोड यवतमाळ येथून सकाळी 8.00 वाजता सुरु होणार आहे. या पदयात्रेत पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अन्य अधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्याच प्रमाणे 500 युवक या यात्रेत सहभागी होणार आहे. तसेच सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन सुध्दा होणार आहे.

सदर पदयात्रा अमोलकचंद महाविद्यालय गोधणी रोड ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जाजू चौक, दत्त चौक, माईदे चौक, अॅग्लो हिंदी स्कुल आणि परत अमोलकचंद महाविद्यालय या मार्गाने भ्रमण करणार आहे. यवतमाळकरांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.