Home Latest News सरपंच संघटना मौदा तालुकाध्यक्ष ग्रामपंचायत तुमान सरपंच धम्मजीत गजभिये यांची महाराष्ट्र प्रदेश...

सरपंच संघटना मौदा तालुकाध्यक्ष ग्रामपंचायत तुमान सरपंच धम्मजीत गजभिये यांची महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी निवड व नियुक्ती 

0
12

किशोर साहू, मौदा :- सरपंच संघटना मौदा तालुकाध्यक्ष ग्रामपंचायत तुमान सरपंच धम्मजीत गजभिये यांची महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना प्रदेशाध्यक्ष प्रा. राजेंद्र कराळे यांनी 23 सप्टेंबरला निवड व नियुक्ती केली.

सरपंच धम्मजीत गजभिये यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याच्या अनुभव तसेच ग्रामपंचायत स्तरावरील कार्याची दखल घेऊन संघटनेने जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांनी नागपूर जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत प्रतिनिधींना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना व न्याय मागण्यांना प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटनेच्या ध्येयधोरणानुसार कार्य करावे ,अशी अपेक्षा सरपंच धम्मजीत गजभिये यांना नियुक्तीपत्र देताना, महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र कराळे यांनी व्यक्त केली आहे.

नियुक्ती झाल्याच्या मागील सात दिवसापासून सरपंच धम्मजीत गजभिये यांच्यावर तालुक्यातील सरपंच मंडळीकडून व त्यांच्या मित्र परिवाराकडून पुष्पगुच्छ देऊन, मनापासून सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना विदर्भ अध्यक्ष ॲड. देवा पाचभाई, शिक्षक अभय गणोरकर, शिक्षक अभिषेक रंगारी तसेच सर्व गावकरी बांधवांच्या विशेष समावेश आहे.