spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शशिकला मातेची पुण्यतिथी उत्साहात

– विश्वविधाता परमसत्य चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

बेला :- विश्वविधाता परमसत्य चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ब्रह्मकालीन श्री संत शशिकला मातेची पुण्यतिथी नजीकच्या पवनी रस्त्यावरील शेतात भक्ती व मंगलमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्य आयोजित जागृती भजन,गोपालकाला व महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला.

ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.रंगराव पोटे यांचे पुढाकाराने दरवर्षी शशिकला मातेचे समाधी स्थळी पुण्यतिथी सोहळा घेण्यात येतो.यंदा तेरावे वर्ष होते. संस्थेच्या संचालिका विजया निंबाळकर व सहकारी महिला कलावंतांनी पूर्वसंध्येला सादर केलेल्या जागृती भजनाने रसिक भक्त तल्लीन झाले. पुण्यतिथीनिमित्त गोपाल कला व महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घेतला.

 देवस्थानसाठी शेतजमीन मिळाली दान

पवनी रस्त्यावरील शेतमालक नरेश गोळघाटे यांनी श्रद्धेपोटी शशिकला मातेच्या देवस्थानाकरिता आपल्या शेतातील 13 हजार चौ.फू.जागा निशुल्क विक्री करून चॅरिटेबल ट्रस्टला दान दिली आहे. समाधी असलेल्या तेथील जागेवर शशिकला मातेचे देवस्थान उभारण्याचा ट्रस्टचा मानस आहे.

पुण्यतिथी सोहळ्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रंगराव पोटे, प्रज्वल गोडघाटे, दीपक गजभिये, अशोक पोटे, दिलीप माथनकर, प्रमिला रंगराव पोटे, अरविंद व मीना माणूसमारे, शिल्पा पोटे, अविनाश राणे, अनिकेत रगडे, आकाश कैकाडी,अंकित रगडे, आशिष सोनवणे, शंकर किरपान, पंकज तीमांडे, मोहन तीमांडे व अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Popular Articles