– वरोरा येथे स्नेहमेळावा; शिक्षक, विद्यार्थी व हितचिंतकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन:
वरोरा :- आदर्श शिक्षक, ज्येष्ठ मार्गदर्शक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदनराव विठ्ठलराव ठेंगणे (सेवागंध) यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार, १८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात आदर्श शिक्षक व मार्गदर्शक म्हणून ओळख असलेल्या ठेंगणे यांचा अमृत महोत्सवी सोहळ्या निमित्त त्यांच्याप्रती आदर, स्नेह आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हा सोहळा रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता. वरोरा येथील वानखेडे सेलिब्रेशन, वणी बायपास रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. या मंगलप्रसंगी ठेंगणे सरांना अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदमय वाटचालीच्या सदिच्छा व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. आदर्श शिक्षक, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक म्हणून त्यांच्याविषयी असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी हा सोहळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे.








