– आरोपीला ०६ तारखेतपर्यंत पी सी आर
कन्हान :- इन्स्टाग्रामवर ओळख करून एका २१ वर्षीय तरुणाने १३ वर्षे ११ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कन्हान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव एहतेशाम आलम वल्द शमीम अख्तर (वय २१, रा. आझाद नगर, ड्रॅगन पॅलेस, कामठी) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.१ जुलै रोजी आरोपीने कामठी येथील पीडित अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली. सुमारे महिनाभर त्यांचे बोलणे झाल्यावर आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दि.३ ऑगस्ट रोजी फिरायला जाण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला आपल्या दुचाकीवरून कन्हान पोलिस स्टेशन हद्दीतील नागपूर-जबलपूर महामार्गावरील वाघोली परिसरातील न्यू मान हॉटेलमध्ये पहिल्यांदा नेले. तिथे एक तास एकत्र घालवल्यानंतर तिला परत आणून सोडले. दि.१८ ऑगस्ट रोजी पुन्हा सकाळी ८.३० वाजता आरोपीने पीडितेला त्याच हॉटेलमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर तीन वेळा शारीरिक संबंध स्थापित केले. दुपारी १.१५ वाजता तिला परत घरी सोडले. तिसऱ्यांदा त्याने तिला त्याच हॉटेलमध्ये नेऊन हिरो कंपनीचा कीपॅड मोबाईल फोन दिला. या फोनद्वारे तो तिच्या संपर्कात होता. याबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली होती. दि.२५ सप्टेंबर रोजी पीडिता फोनवर बोलत असताना तिच्या भावाने पाहिले. आई-वडिलांनी विचारणा केल्यावर तिने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. पीडितेच्या तक्रारीनुसार, कन्हान पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता बीएनएस २०२३ कलम ६४ (२) (एम),३५१ (२) बीएनएस, सहकलम ४, ६, ८, १२ नुसार पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शनिवारी दि.४ ऑक्टोंबर रोजी कामठी येथून आरोपीला अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, पीएसआय एकनाथ राठोड,पीएसआय प्रवीण हारगुडे, रवी मिश्रा यांनी केली आहे.
आरोपीला ०६ तारखेतपर्यंत पी सी आर : गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी न्यायालयात शनिवार ०४ तारखेला हजर केले असून सोमवार पर्यंत पी सी आर देण्यात आला आहे. तपास अधिकारी पीएसआय एकनाथ राठोड पुढील तपास करत असून प्रकरणात महत्वाच्या बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे ज्यामध्ये लॉजिंग नियमाने येणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड हे माहिती साठी घेणे आवश्यक असते तरी लॉज धारकाने आधार घेतल्या विना परवानगी दिली कशी ? सारख्या इतर महत्त्वाच्या बाबी कडे पोलिसांचे बारीक लक्ष आहे.








