Home Latest News शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शुभमचा सत्कार

शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शुभमचा सत्कार

0
47

तिरोडा १० :- महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये 84 kg कॅटेगरीत 180 kg वजन उचलून द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या तिरोडा तालुक्यातील भिवापूर गावचा सुपुत्र शुभम मेश्राम याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युवा नेते  रविकांत बोपचे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
शुभमच्या या यशामुळे भिवापूर गावासह संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढला आहे. निमित्ताने पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्याला भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे