– सत्काराने मिळाली नवी उर्जा सामाजिक जाणीव व लोकसहभागातून साधणार विकास- नगराध्यक्ष पियुष बुरडे
खापा :- शिव गणेश क्रिडा मंडळ व माऊली माता मंदिर कमेटी माळीपुरा, खापा यांच्या वतीने सोमवार (दि.१९) रोजी माळीपुरा व माताखेडी भागातून निवडून आलेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सदस्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यात ५ भाजपा, १कॉंग्रेस आणि १ अपक्ष अशा ७ सदस्यांचा मंडळाच्या वतीने सामाजिक जाणिवेतून पक्षभेद बाजूला सारून शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष पियुष बुरडे, उपनगराध्यक्ष सुनील पाहुणे, सदस्य किशोर आष्टणकर, निखिल आष्टणकर, शोभा कारणकर, अंजली आनंद मेनकुदळे, मिलिंद बुरडे यांनी सत्कार स्विकारला.
या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान न. प. राजेंद्र हायस्कूल, खापाचे मुख्याध्यापक सुनील नेहारे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक आनंदराव कुंथे, माजी शिक्षक गुलाबराव उफाट, ज्येष्ठ नागरिक गोकुळदेव महाजन, मधुकर निर्मल, पुजारी बाबा आवते, श्रीराम उमाळे, मुरलीधर चलपे,दिलीप मालोकर, राजेंद्र गाडगे व अनिल बोळाखे यांनी स्थान भुषविले.
माळीपुरा व माताखेडी येथील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सन्मान सोहळ्याने आम्ही सगळेच भारावून गेलो असून आमची जबाबदारी वाढली असून नागरिकांच्या अपेक्षा पुर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची खात्री सत्काराला उत्तर देताना सुनील पाहुणे आणि निखिल आष्टणकर यांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिव गणेश क्रिडा मंडळ व माऊली माता मंदिर कमेटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उमाळे, विरेंद्र तायवाडे,सचिन कुंथे, प्रशांत चलपे,लोकेश महाजन, धिरज उफाट, राहुल नर्मल, अभय भोकरे,अमित टेटे, दीपक नारे, तेजस मस्के, मंथन सहारे,आकाश उमाळे, सुरज उमाळे, छत्रपाल चलपे, पंकज बोळाखे, सक्षम तातेड, जितेंद्र मुरकुटे, अक्षय मालोकर, राजेश तायवाडे, सागर मालोकर यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन दीपक नारे, प्रास्ताविक सचिन कुंथे तर आभार प्रदर्शन अमित टेटे यांनी केले.








