spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहात साजरी

– रयतेचा राजा, स्वराज्याचा शिल्पकार, अश्वारूढ मुद्रेतून आजही देतोय धैर्य, शौर्य, आणि स्वाभिमानाचा संदेश ….

नागपूर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपूर शहरातील शिवसेना सह संपर्कप्रमुख ओंकार पारवे, युवा सेना जिल्हाप्रमुख शरद सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ला येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वराज्य स्थापनेचा ध्यास घेतला. तोरणा, राजगड, सिंहगड यांसारखे अनेक किल्ले जिंकून त्यांनी मजबूत राज्य उभे केले. १६७४ साली रायगड किल्ला येथे त्यांचा भव्य राज्याभिषेक झाला आणि ते “छत्रपती” झाले. प्रशासन व धोरण शिवाजी महाराजांनी सुबक आणि शिस्तबद्ध प्रशासन उभारले. अष्टप्रधान मंडळ, मजबूत आरमार (नौदल) आणि शिस्तबद्ध सैन्य ही त्यांच्या कारभाराची वैशिष्ट्ये होती. त्यांनी स्त्रियांचा सन्मान, सर्वधर्मसमभाव आणि रयतेची काळजी या तत्त्वांना प्राधान्य दिले. शिवाजी महाराजांचे धैर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रप्रेम आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा स्वाभिमान आणि न्यायनिष्ठा समाजाला एकत्र आणणारी शक्ती आहे. यावेळी ओंकार पारवे, युवा सेना जिल्हाप्रमुख शरद सरोदे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर, उपजिल्हा संघटिका गायत्री वैद्य, गणेश सोलंकी, युवासेना शहर प्रमुख सलमान खान, उपजिल्हाप्रमुख गणेश डोईफोडे, आकाश पांडे, महेश ठाकूर, अरविंद राणे, राहुल मलिक, आकाश पांडे, किशोर सराईकर, आनंद पापडकर, पुनम हरवडे, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.