– महावितरण व्दारे शेतकरी, नागरिकावर होणारा अन्याय सहन होणार नाही- प्रकाश जाधव
कन्हान :- महावितरणच्या कन्हान विभागाच्या कर्मचाऱ्यांकडुन होणारी अरेरावी, मनमानी कारभार सपवु न शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याकरिता शिवसेना (उबाठा) पारशिवनी तालुका व्दारे उपकार्यकारी अभियंता स. व स. उपविभाग म. रा.वि. वितरण कंपनी मर्या. कन्हान येथे धडक देत शेत करी, नागरिकावर होणारा अन्याय कधापि सहन होणार नाही. तात्काळ शेतकरी व नागिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली.
सोमवार (दि.२२) जुन ला शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी खासदार प्रकाश जाधव, नागपुर ग्रामिण जिल्हा प्रमुख सुत्तम मस्के यांच्या नेतुत्वात पारशिवनी तालुका प्रमुख रविंद्र चकोले हयानी उपकार्यकारी अभियंता स. व स. उपविभाग म.रा.वि. वितरण कंपनी मर्या. कन्हान चे उपकार्यकारी अभियंता किशोर निंबाळकर हयांची भेट घेऊन कन्हान शहर व ग्रामिण भागात महावितरण कर्मचाऱ्यांची अरेरावी व बेजबाबदार वर्तन, संपर्क यंत्रणेचा अभाव, अवाजवी वीज बिले आणि वीज कपात, अनेक भागात वीज पुरवठा खंडित राहिल्याने अंधाराचे साम्राज्याने शेतीचे नुकसान होत असुन गुन्हेगारीचा व अपघातांचा धोका वाढला आहे. तक्रार नोंदवहीचा अभाव अश्या अनेक समस्याने शेतकरी, नागरिक सद्यस्थितीत महावितरणच्या कारभारा मुळे तसेच कर्मचा-यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी प्रचंड त्रस्त असल्याने कर्तव्यात कसुर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंग कारवाई करण्यात यावी.जनतेच्या फोनला तात्काळ उत्तर देऊन त्यांच्या समस्या सोडविण्यात यावी.

अघोषित वीज कपात त्वरित थांबवावी. तसेच तांत्रिक चुकांमुळे आलेली अवाजवी व चुकीची वीज बिले दुरुस्त करून जनतेला दिलासा दयावा. खंडीत विजेमुळे झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी. प्रत्येक गावात अधिकृत तक्रार नोंदवही’ असावी, त्यात स्थानिक स्तरावर सम स्यांची नोंद होत निवारण होईल. जेणेकरून गावक-याना तक्रारीकरिता कन्हान कार्यालयाच्या चकरा कराव्या लागणार नाही. या न्याय्य मागण्या विभागाने तातडीने सकारात्मक घेत समस्यांचे निराकरण सात दिवसात करावे. अन्यथा यापुढे जनतेचा अंत न पाहता शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तेव्हा निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला आणि संपुर्ण परिणामांना आपले महावितरण प्रशासनच सर्व स्वी जबाबदार राहिल अशा इशारा निवेदनातुन देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना कन्हान शहर प्रमुख भारत पगारे, कांद्री शहर प्रमुख सुरेश आंबिलढुके, जिवन ठवकर, अभिलाष चकोले, डोमाजी चकोले,चरण येरणे, संकित राऊळ, प्रदीप चकोले, आयुष राऊळ, सुरेंद्र चकोले, अमोल चांदेवलुके, मंगेश अंबागडे, अमित राऊत, मिलिंद राऊळ, पंकज राऊळ सह गावकरी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकरी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येईल – किशोर निंबाळकर
महावितरण कन्हान चे उपकार्यकारी अभियंता किशोर निंबाळकर हयांनी कन्हान ग्रामिण अभियंता वाघमारे आणि कन्हान शहर अभियंता श्रीवास्तव हयाना वेळीच बोलावुन आपण स्वत: आणि आपल्या अधिनस्त कर्मचा-यांना ताकीद देऊन वेळेच्या वेळीच समस्याचे निराकरण करावे. कार्यप्रणाली सुधारून यानंतर शेतकरी आणि नागरिक विधृत ग्राहकांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्यास सांगितले आणि प्राथमिकतेने शेतकरी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येईल. असे आश्वासन दिले.




