spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजेंद्र हायस्कूलमध्ये योगासनांचे प्रात्याक्षिक

खापा, वार्ताहर :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खापा येथील राजेंद्र हायस्कूलमध्ये रविवारी (ता. २१) योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या पटांगणात आयोजित योग शिबिरात विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

योग शिक्षिका संगीता चौधरी आणि ज्योती चौधरी यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम तसेच योगाचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने योगाभ्यासात सहभाग नोंदविला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील नेहारे यांनी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व विशद करत योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असल्याचे सांगितले. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक शामराव खडसे, सुनील हेडाऊ, प्रमोद बावनकुळे, असलम खान, सुनील भांगरे, इमरान खान, अनिल टेकाडे, सोनाली सावनकर, नम्रता मडके, प्रवीण मेश्राम, अर्चना सूरजुसे, महेंद्र आष्टनकर, शिल्पा वारोतकर, वर्षा बावनकुळे, दिलीप रंभाळ, दिवाकर बारापात्रे, प्रकाश कोल्हे, वंदना खंडाळे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles