spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कोटगलमध्ये शिवरायांचा जयघोष! चेतन ग्राफिक्स आणि साथ फाउंडेशन ता जि. गडचिरोलीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील कोटगल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक ‘चेतन ग्राफिक्स’ आणि साथ फाउंडेशन ता जि. गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर “जय भवानी, जय शिवाजी” च्या जयघोषाने निनादला होता. महाआरती झाल्यानंतर लगेज महाप्रसाद वितरण करण्यात आहे.

या सोहळ्याचे आयोजन चेतन ग्राफिक्स आणि साथ फाउंडेशन ता जि. गडचिरोली , यांनी केले असून, युवकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवणे आणि सामाजिक एकोपा जोपासणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमात मोहन ठाकरे सामाजिक कार्यकर्ता, मनोहर दुधाबावरे,  रामदास ठाकरे, शिवाजी भोयर, बालाजी कोलते. निधी अमोल गद्देवार, आकाश भोयर, हरिष कोलते, गावातील नागरिक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते व चेतन ग्राफिक्सचे मालक व साथ फाऊंडेशन चे सचिव चेतन कोलते यांनी आयोजन केले.

साथ फाउंडेशनच्या सदस्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य आणि त्यांचे शौर्य आजही आपल्याला प्रेरणा देते. चेतन ग्राफिक्सच्या वतीने गावातील या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.