spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खापा येथे ‘गाथा शिवरायांची व लोककलेची’ युवा मित्रपरिवाराचे आयोजन, शौर्य स्वाभिमान अन् स्वराज्याचा जल्लोष

खापा, वार्ताहर :- युवा मित्र परिवाराच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने ‘गाथा शिवरायांची व लोककलेची’ या कार्यक्रमाचे बाजार चौक येथे स्थित बँक ऑफ बडोदा समोरील प्रांगणात गुरुवार (दि. १९ फेब्रुवारी) रोजी आयोजन करण्यात आले होते.

मनिष मारोतकर यांनी शिवगर्जनेची मानवंदना दिली. त्यानंतर निर्माता दिग्दर्शक व सेने अभिनेते शाहीर विनय भगत, चंद्रकांत कराडे, संगीत शुभम खंडारे (अमरावती) आणि संच यांनी शिवकालीन कलांचे नेत्रदीपक सादरीकरण करण्यात आले. सादर झालेले शिवकालीन प्रसंग बघून प्रेक्षक भारावून गेले होते.

सदर आयोजन मुकेश पावडे, मकसूद शेख, सचिन भैसारे, प्रज्वल नंदनवार, स्नेहल सुपारे, चरण गजभिये, आकाश प्रजापती, गोलू नंदनवार, आशिष सिंग राठोड, अंकित मुंगोले, अक्षय हिंगे, राहुल आष्टणकर, गोलू बारापात्रे, अमोल लांबट, आकाश हिवरकर, खापा शहरवासी व शिवाजी महाराजांच्या भक्तांच्या विशेष प्रयत्नाने करण्यात आले होते.

‘छावा’ने वेधले लक्ष’

शाहीर विनय भगत प्रस्तुत आणि चंद्रकांत कराळे दिग्दर्शीत ‘गाथा शिवरायांची व लोककलेची’ कार्यक्रमा अंतर्गत शिवाजी महाराजांवर उत्कृष्ट शिवगीते, पोवाडे, देशभक्तीपर गीते सादरीकरणासह छावा प्रसंग सादर करण्यात आला. या प्रसंगाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. यात विनय भगत यांनी छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा साकारली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.