खापा, वार्ताहर :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ढकारा (ता. सावनेर) येथे शिवजन्मोत्सव सोहळा (दि.१९) गुरुवारला आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित या सोहळ्याला कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषद खापाचे नगराध्यक्ष पियुष बुरडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप खापा केळवद मंडळ महामंत्री मंगेश पुरे तर उपाध्यक्ष स्थानी हंसराज उईके हे होते.
या सोहळ्याच्या आयोजनाकरिता पंकज रुंघे, निखिल शांडिले, विक्की सौसागडे, अक्षय रुंघे, सौरभ रंधई, महेंद्र सौसागडे, शुभम इवनाते, कार्तिक रुंघे, मयुर शांडिले, आकाश अरतपायरे व समस्त गावकरी व शिवराय ग्रुप ढकारा यांनी अथक परिश्रम घेतले.




