spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दोन महिन्यांपासून टपाल तिकिटांचा तुटवडा-नागरिक त्रस्त

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- टपाल कार्यालय रामटेक येथे मागील दोन महिन्यांपासून टपाल तिकिटांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे नागरिकांना साधी टपाल पाठविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. साध्या पत्रावर पाच रुपयांचे तिकिट लावून काम होत असताना, आता नागरिकांना पर्याय नसल्याने वीस रुपये खर्च करून स्पीड पोस्टचा वापर करावा लागत आहे. पोस्टमास्तर चोपकर यांनी सांगितले की, कामठी मुख्य टपाल कार्यालयाकडून तिकिटांचा पुरवठा होत नसल्याने ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे रामटेक तालुक्यातील अनेक गावांनाही या तुटवड्याचा फटका बसत आहे. सेवानिवृत्त अभियंता लक्ष्मण महाजन यांनी सांगितले की, “गेल्या दोन महिन्यांपासून टपाल तिकिटासाठी पोस्ट ऑफिसचे अनेक फेरे मारले, पण आजतागायत तिकिट मिळालेले नाही.” स्थानिक नागरिकांनी टपाल विभागाकडे तातडीने तिकिटांचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकेल.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.