किशोर साहू, मौदा ,ता.६:- चाचेर येथील बाजार चौकातील लक्ष्मीनारायण मंदिरात उद्या गुरुवार ( दि. 6 नोव्हेंबर) ला सायं. 6 वाजता खाटूवाले श्री श्याम बाबा यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादासह श्री श्याम भजन संध्या ,एक शाम लखदातार के नाम चे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी सुप्रसिद्ध भजन गीत गायक नागपूर येथील जया आचार्य ,हर्ष शर्मा, कामठी येथील गोपाल पुरोहित, अर्चना पुरोहित यांची सुरेल संगीतासह भजने होणार आहेत. तरी नागरिकांनी महाप्रसादासह या श्री श्याम भजन संध्याच्या लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.




