spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

श्री चक्रधर स्वामी जयंती उत्साहात साजरी

 

सचिन चौरसिया, रामटेक २६ – गट ग्रामपंचायत काचुरवाही अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोडगाव येथे दिनांक २५ ऑगस्ट रोजी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती (अवतार दिन) उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात अध्यात्मिक वातावरण निर्मिती झाली.

याच वेळी वर्ग १ चा विद्यार्थी ओम हरिदास ठाकरे याचा वाढदिवस देखील आनंदात साजरा करण्यात आला. सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांनी त्याला मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला माजी सरपंच व प्रख्यात शाहीर शिशुपाल अतकरे, दिगांबर आडकने, सुरेशराव आडकने, योगिराज आडकने, शिक्षक कोडवती सर, वरठी सर, लक्ष्मीबाई गायकवाड तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.