प्रतिष्ठाद्वादशी व नववर्ष निमित्त नागपुरातील श्रीराम मंदिरांमध्ये झाला श्रीरामभक्तीचा जागर

0
64

जागर भक्तीचा- आध्यात्मिककार्यक्रम यांचे द्वारे प्रतिष्ठाद्वादशी व नववर्षाचे औचित्याने गुरुवार दि १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेपासून नागपुरातील १३ श्रीराम मंदिरांमध्ये श्रीरामभक्तीचा जागर भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीराम मंदिर टिळक पुतळा गांधीसागर येथे दयाशंकर तिवारी,यांचे शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी डॉ उपेंद्र कोठेकर, संजय भेंडे,अरुण जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांचे विशेष उपस्थितीत श्रीराम मूर्तीचे पूजन, पुष्पर्चन व रामरक्षा मारुती स्तोत्र व महाआरती करण्यात आली. यानंतर क्रमशः शिरपूरकर श्रीराम मंदिर, श्रीराम मंदिर संघ बिल्डिंग महाल ,छत्तीसगढी श्रीराम मंदिर – नाईकवाडी नाईक तलाव श्रीराम मंदिर, चिटणवीस पुरा , श्रीराम मंदिर- नाईक रोड , श्रीराम मंदिर अयोध्या नगर , श्रीराम मंदिर धन्तोली, राम मंदिर सीता नगर, श्रीराम मंदिर स्वावलंबी नगर , श्रीराम मंदिर – लक्ष्मी नगर, तसेच रात्री कार्यक्रमाचा समारोप श्रीराम मंदिर, राम नगर येथे रवी वाघमारे यांचे मुख्य उपस्थितीत करण्यात आला.प्रत्येक मंदिरात श्रीराम मूर्तीला पुष्पहार , सामूहिक श्रीरामरक्षा ~मारुती स्तोत्र पठण करून आरती करून शेवटी प्रसाद वितरण करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ श्रीरंग वराडपांडे यांचे असून कार्यक्रमाला यशस्वी करण्यात सुजाता काठोटे, अभिजीत कथले, सपना रोडी, चंद्रशेखर दुबे, चंद्रिकप्रसाद पांडे, ज्योती हराड, विजय येरणे, सीमा सराफ, सुजाता खंबाता , दर्शना नखाते विश्वनाथ कुंभलकर आणि परिसरातील भाविकांनी सहकार्य केले असून रामभक्तांनी उत्साहात सहभाग घेतला.