कन्हान :- शहरात विविध संघटन द्वारे श्री संत बाबा ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ताजश्री मित्र परिवार धरम नगर कन्हान
ताजश्री मित्र परिवार धरम नगर कन्हान द्वारे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा संत बाबा ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव निमित्त बाबा ताजुद्दीन यांचा प्रतिमेस चादर चढवुन पुजा अर्चना करुन धरम नगर येथुन संदल काढण्यात आला. संदल पिपरी मार्गाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक तारसा रोड चौकातुन परत पिपरी मार्गाने धरम नगर येथे सातपुते यांचा निवासस्थानी संदलचे समापन करण्यात आले. केक कापुन प्रसाद वाटप आणि महाप्रसाद वितरण करुन बाबा ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता उमेश सातपुते, रुपेश सातपुते, सीमा सातपुते यांच्या सह ताजश्री मित्र परिवारांनी परिश्रम घेतले.
सत्रापुर मित्र परिवार कन्हान
सत्रापुर मित्र परिवार कन्हान द्वारे संत बाबा ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव निमित्त गांधी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सत्रापुर काली माता मंदिर येथुन ढोल, ताशाच्या गजरात, डीजेच्या मधुर आवाजात संदल काढण्यात आला. संदल मध्ये घोडे, बग्गी आर्कषित ठरली असुन शैकडो नागरिक सहभागी झाले होते. संदल महामार्गाने गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तारसा रोड चौक होत परत महामार्गाने गांधी चौक येथे संदलचे समापन करण्यात आले. संत बाबा ताजुद्दीन यांचा प्रतिमेचे पुजन करुन बाबाच्या नावाने घोषणा देत केक कापुन प्रसाद वाटप आणि महाप्रसाद वितरण करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक केतन भिवगडे, उत्तम बाबा दुरुकार , कुमार बाबा पात्रे, शक्ती पात्रे, नेवलाल पात्रे, सावण लोंढे, रामाजी पात्रे, सावण रोकडे, युवराज पात्रे, अर्जुन पात्रे, बिरजू हातागळे, किम्मत पात्रे, विक्रम उमप, भुरा पात्रे, किशोर शेंडे, अमर पात्रे, सतिश नाडे, महेंद्र खडसे , वनिल पात्रे, सेवर लोंढे, महेंद्र शेंडे, नाना कापसे, सन्नी पात्रे, कपिल लोंढे, महिपाल पात्रे, सुरेश गायकवाड, समिर पात्रे, रामा पात्रे, लखण पुरवले, पाउसलाल लोंढे , कोहिनुर हातागळे, हरिष पात्रे, नकुल गायकवाड, अश्विन शेंडे, चंदन पात्रे, अर्जुन गायकवाड, गगन पात्रे, डायनल शेंडे, विष्णू पात्रे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगीत भारती मित्र परिवार कन्हान
कन्हान परिसरातील गांधी चौक येथे संगीत भारती मित्र परिवार द्वारे संत बाबा ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्य क्रमात प्रामुख्याने उपस्थित राजा टाकसाडे, डॉ. मनोहर पाठक, अशोक पाटील यांच्या हस्ते बाबा ताजु द्दीन यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी गांधी चौक येथुन ढोल, ताशाच्या गजरात संदल काढुन महामार्गाने आंबे डकर चौक, तारसा रोड चौक, गहुहिवरा चौक होत बाबा ताजुद्दीन छोटी वाकी दरबार गहुहिवरा येथे चादर चढवुन पुजा अर्चना करण्यात आली. संदलचे महामा र्गाने परत होऊन गांधी चौक येथे समापन करण्यात आले. त्यानंतर केक कापुन प्रसाद वाटप करून महा प्रसाद वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी संगीत भारती, सुनील लाडेकर, अशो क पाटील, क्षरोहित मानवटकर, स्वप्निल वाघधरे, राजेंद्र हटवार, रजनीश मेश्राम, मनोज मेश्राम, नितिन मेश्राम, आकाश वाढणकर, हरिष खंगारे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




