spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीराम अर्बन को-ऑप. बँक लि. चे उद्घाटन

नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीराम अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या चिंचभवन शाखेचे उद्घाटन झाले.

चिंचभवन येथील काचोरे पाटील नगरात या बँकेच्या 6 व्या शाखेचे उद्घाटन झाले. महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार संदीप जोशी, महापौर नीता ठाकरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, श्रीराम अर्बन को- ऑप. बँक लि.चे अध्यक्ष पराग सराफ, उपाध्यक्ष अजित गोकर्ण आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बँकेचे अध्यक्ष पराग सराफ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना बँकेच्या प्रगती विषयी माहिती दिली तसेच संचालक मंडळाचा परिचय करून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेच्या नवीन शाखेला आणि संपूर्ण संचालक मंडळ व अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Popular Articles