spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘सशक्त महिला, सशक्त समाज, समृद्ध शहर’ अंतर्गत चंद्रपूर शहरात एकल महिला सर्वेक्षण नोंदणी अभियान

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ‘सशक्त महिला, सशक्त समाज, समृद्ध शहर’ या संकल्पनेअंतर्गत शहरातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व अविवाहित एकल महिलांची माहिती संकलित करण्यासाठी ‘एकल महिला सर्वेक्षण नोंदणी’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून एकल महिलांची अचूक माहिती उपलब्ध होऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ, आर्थिक व सामाजिक सहाय्य, आरोग्य सुविधा, शिक्षण व कौशल्य विकास, सुरक्षा व संरक्षण तसेच सामाजिक समावेशन यांसारख्या सुविधांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.

महानगरपालिका प्रशासनामार्फत उपलब्ध होणाऱ्या या माहितीच्या आधारे एकल महिलांच्या गरजा लक्षात घेऊन योग्य नियोजन व आवश्यक उपाययोजना करण्यास सहाय्य मिळणार आहे.

चंद्रपूर शहरातील पात्र विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व अविवाहित एकल महिलांनी सर्वेक्षणात सहभागी होऊन आपली माहिती नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्वेक्षणासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकृत सर्वेक्षण लिंकवर माहिती भरता येईल. तसेच दिलेला QR कोड स्कॅन करूनही नोंदणी करता येणार आहे.

सर्वेक्षण लिंक :

https://survey.ccmcchandrapur.com/

“चला, एकल महिलांची नोंदणी करून त्यांना सक्षम बनवूया!”

— चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.