spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विदर्भातील शेतकरी व ग्रामीणविकासासाठी VNIT सहित सामाजिक संस्थानी पुढाकार घेऊन कार्य करावे – डॉ.विजय भटकर

नागपूर :- VNIT नागपूरसह विविध संस्थांचा संयुक्त सहभाग युवा सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण व कौशल्य विकास या क्षेत्रात कार्यरत ASPECTI Social Association यांच्या पुढाकाराने विदर्भातील ग्रामीण भागात बायोगॅस प्रकल्प वितरण व अंमलबजावणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर यांना ज्ञान भागीदार (Knowledge Partner) म्हणून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. हा उपक्रम संपूर्ण विदर्भात राबविण्यात येणार असून आज, अकोला जिल्ह्यातील ग्राम मुरांबा (ता. मूर्तिजापूर), अमरावती जिल्ह्यातील ग्राम रेवसा (ता.अमरावती) तसेच नागपूर जिल्ह्यातील ग्राम उमरी वाघ (ता.हिंगणा) या गावांमध्ये बायो गैस संयंत्र निशुल्क वितरित करण्यात आले, या माध्यमातून स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जा, शाश्वत ग्रामीण विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार असे संयंत्र निर्माते अभिमन्युजी पुणे कडून सांगण्यात आले. Youth-Empower या प्रकल्पांतर्गत VNIT नागपूरकडून तांत्रिक सल्ला, नवोन्मेषी तंत्रज्ञान, अंमलबजावणी मार्गदर्शन तसेच प्रकल्पाशी संबंधित डेटाचा अभ्यास व संशोधनासाठी सातत्यपूर्ण मदत उपलब्ध होणार आहे. यामुळे शैक्षणिक संशोधन आणि ग्रामीण विकास यांचा प्रभावी संगम साधला जाणार आहे. तसेच सामाजिक संस्थेच्या कामावर व गुणवत्तेवर लक्ष्य ठेवणे हे असेल.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान VNIT नागपूरचे संचालक प्रा.डॉ.प्रेमलाल पटेल यांनी भूषविले. तसेच या सोबत नैसर्गिक शेतीच्या नियोजनात व योगिक शेती सम्बंधित कार्य करून शेतकर्यांचे उत्पन्न वाढवू शकू यावर्ती भर दिला. यासाठी ब्रह्माकुमारी सेन्टर चे मार्गदर्शन व विचारांना लक्षात घेता पुढील कार्यवाही करण्यात यावी असे सांगण्यात आले. या कार्यक्रमास प‌द्मभूषण डॉ. विजय भटकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. कमल सिंग (माजी कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व अध्यक्ष, ASPECT India Social Association), राजयोगिनी संगीता, ब्रह्मकुमार प्रेमप्रकाश, बबनराव तायवाड़े (माजी व्यस्वस्थापन परिषद् सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपुर), धनंजय धार्मिक (माजी आयकर आयुक्त व अध्यक्ष, समृद्ध विदर्भ -समृद्ध भारत) हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी विशेषतः दिल्ली वरुण आलेले प्रमुख पाहुने डॉ.जगवीर रावत (राष्ट्रीय संयोजक, The Bharat Innovation, Research and Development Cooperative Forum, नवी दिल्ली) गांधीजींचे विचारावर आधारित ग्रामशक्ती योजना असावी आणि त्याचा आधारावर पंतप्रधान मोदीचे कार्य करण्याकरीता मला गुजरात तसेच महाराष्ट्र व ग्रामीण भागात काम करण्याचे आदेश दिला आहेत आणि केंद्रशाशना कडून CSR चे माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वाशन दिले. या उपक्रमासाठी India International Multiversity, पुणे, VNIT नागपूर ASPECTI Social Association, गुरुदेव सेवा मंडळ, मोजरी, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि समृद्ध विदर्भ समृद्ध भारत या संस्था संयुक्त सहकार्य भागीदार म्हणून सहभागी होतील. याप्रसंगी समन्वयी प्रस्ताव डॉ. स्वप्निल कोकाटे सचिव Aspect India Social Association यांनी केले. या कार्यक्रमात डॉ.विजय भटकर यांच्या शुभ हस्ते समाजसेवी रामु अग्रवाल, जगदीश गुप्ता, जनाब युसूफ भाई, प्रवीणा सेठिया यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन VNIT तर्फे दिवाकर शेंडे यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन सोनाली बुंदे यांनी प्रभावीपणे केले तर प्रस्ताविक डॉ.अनिल वाघ यांनी केले. याप्रसंगी पाहुनांचे स्वागत अधिवक्ता राजीव देशपांडे, स्वामी संजय कटकमवार, सविता पांडे यांनी केले. या उपक्रमामुळे विदर्भातील ग्रामीण भागात पर्यावरणपूरक ऊर्जा, तांत्रिक नवोन्मेष आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास डॉ.विजय भटकर यांनी व्यक्त केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.