spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडाऱ्यात महायुतीत ठिणगी; शहर विकास निधीवरून भाजप आणि शिंदे गटात जुंपली!

हंसराज,भंडारा :- महायुतीमधील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय संघर्ष भंडाऱ्यात विकोपाला गेला आहे. शहर विकास निधी थांबवणे, मंजूर कामे इतरत्र वळवणे आणि निधीचा दुरुपयोग करणे, असे गंभीर आरोप भाजप नेत्यांनी स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर केले आहेत. या वादाने जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

मंगळवारी सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा मधुरा मदनकर, भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आमदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

शहराचा १७ कोटींचा निधी पळवला:

नगराध्यक्षा मदनकर नगराध्यक्षा मधुरा मदनकर म्हणाल्या की, “नगर परिषदेची जबाबदारी स्वीकारली तेव्हा विकास निधीच्या नावाखाली काहीही शिल्लक नव्हते. शहरासाठी मंजूर झालेला १७ कोटी रुपयांचा निधी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पवनी तालुका संकुलासाठी वळवला. यामुळे शहरातील रस्ते, नाली बांधकाम आणि खड्डे दुरुस्तीसारखी १०० हून अधिक विकासकामे रखडली आहेत. याचा मोठा फटका भंडारा शहराच्या जनतेला सोसावा लागत आहे.”

निधीचा खासगी कामासाठी वापर:

जॅकी रावलानी भाजप नेते आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य जॅकी रावलानी यांनी आमदारांवर पदाच्या दुरुपयोगाचा आरोप केला. ते म्हणाले की, “शिरसी गावातील रस्ते कामासाठी मंजूर झालेल्या निधीचा वापर आमदार भोंडेकर यांच्या ४० एकर जागेत पसरलेल्या खासगी मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत रस्ते निर्मितीसाठी करण्यात आला आहे.” तसेच, ‘आर्य कन्स्ट्रक्शन’ आणि ‘श्रीहन इन्फ्रा’ या कंपन्यांचा भोंडेकर कुटुंबाशी जवळचा संबंध असून, नगर परिषदेच्या कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा दावाही रावलानी यांनी केला. याप्रकरणी न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चुकीची वक्तव्ये थांबवा, अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार:

विनोद बांते जिल्हा परिषदेतील भाजपचे गट नेते विनोद बांते यांनी आमदारांना इशारा दिला आहे की, “सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाजप नेत्यांविरुद्ध चुकीची वक्तव्ये करणे आमदारांनी थांबवावे. असे न झाल्यास महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे याची तक्रार करण्यात येईल.” माझ्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे आहेत आणि हे सर्व आरोप केवळ राजकीय आकसापोटी केले जात आहेत.”

या पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष सचिन कुंभलकर, नगर परिषद उपाध्यक्ष चंद्रकला भोपे, रीना चड्ढा, भगवान बावनकर, ॲड. कैलास भूरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. भंडाऱ्यातील या वादाने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमधील दरी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सर्व आरोप तथ्यहीन:

आमदार नरेंद्र भोंडेकर दुसरीकडे, आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, “नगर परिषदेची जुनी समिती निधीचा चुकीचा वापर करत होती, म्हणूनच तो निधी रोखून जनतेच्या कामासाठी वळवण्यात आला. मेडिकल कॉलेज परिसरात सरकारी निधीतून कोणताही रस्ता बांधण्यात आलेला नाही.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.