spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पद्मश्री रमेश पतंगे आणि ज्येष्ठ लेखक दिनेश गुणे यांच्या विशेष मुलाखतींचे प्रसारण

 

मुंबईदि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संविधान हत्या दिनानिमित्त‘ ज्येष्ठ विचारवंतलेखक व संपादक पद्मश्री रमेश पतंगे तसेच ज्येष्ठ लेखक आणि संपादक दिनेश गुणे यांच्या मुलाखती प्रसारित करण्यात येणार आहेत.

भारतीय संविधान आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. संविधानामुळेच देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार मिळाले आहेत. संविधानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासन लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. देशात २५ जून १९७५ रोजी लागू झालेल्या आणीबाणीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमधून भारतीय संविधानाची निर्मितीआणीबाणी लागू करण्यामागील कारणे व त्याचा नागरिकांवर झालेला परिणाम या विषयांवर पतंगे व  गुणे यांनी या दोन्ही कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

 

 ‘दिलखुलास’ कार्यक्रम पद्मश्री रमेश पतंगे यांची निवेदक दीपक वेलणकर यांनी घेतलेली मुलाखत बुधवारदि. २५ आणि गुरूवार दि. २६ जून २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे. दिनेश गुणे यांची निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी घेतलेली मुलाखत शुक्रवार दि. २७ जून २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० आकाशवाणी व ‘News On AIR’ अॅपवर प्रसारित होणार आहे.

जय महाराष्ट्र’ कार्यक्रम पद्मश्री रमेश पतंगे यांची निवेदक दीपक वेलणकर यांनी घेतलेली मुलाखत बुधवार२५ जून २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुक,  एक्स आणि युट्यूब या समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.