किशोर साहू, मौदा ,ता.२७:- शनिवार( दि. 25 ऑक्टोबर)ला भारतीय जनता पार्टी चाचेर – निमखेडा सर्कल वतीने चाचेर येथे बरबटे कॉम्प्लेक्स मध्ये दिवाळी पंचमी निमित्त दिवाळी स्नेह मिलनाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी भारतीय जनता पार्टी च्या सुसज्जित कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.


याप्रसंगी राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल, जिल्हा महामंत्री भाजपा नागपूर ग्रामीण राहुल किरपान, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे, चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण,माजी पंचायत समिती उपसभापती खेमराज चापले ,कल्पना घाटबांधे,दिनेश बादोले , अशोक बावनकुळे , संजू वाघमारे ,कैलास सोमनाथे ,एकनाथ टेंभरे,विकास झाडे,रजत महादुले, धनराज हारोडे,मोतीराम घरझाडे,सूभाष खेरगडे,नंदू मेहर ,सुरेश भिलकर, मोमदेव देशमुख,जीवन वंजारी ,तसेच समस्त भारतीय जनता पार्टी चे बूथ अध्यक्ष,गाव प्रमुख, युवा मोर्चा,महिला आघाडी प्रमुख कार्यकर्ता आणि चाचेर – निमखेडा सर्कल मधील सरपंच ,नागरिक आणि गावकरी बांधव उपस्थित होते.








