– रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती
– राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग
नागपूर :- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) च्या सहकार्याने स्वीप कार्यक्रम अंतर्गत काढण्यात आलेल्या ‘वॉक विथ वोटर्स इन लो वोटर एरिया’ या मतदार जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिव्हील लाईन येथील वॉकर स्ट्रीट सह सर्व झोन मधून एकाच वेळी रॅलीला सुरुवात करण्यात आली.सजग नागरिक, मतदार करा, नागपूरच्या विकासासाठी मतदान करा, महिला मतदान, सक्षम लोकशाही, अशा घोषणा देत मतदार अधिकार रथ यात्रेने संपूर्ण शहरात मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.
यावेळी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, उपायुक्त तथा स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. रंजना लाडे, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे, स्वीप समन्वयक डॉ. सुशांत चिमणकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर यांनी जनजागृती रॅलीत भाग घेतला. या रॅलीच्या उद्देश्य कमी मतदान होणाऱ्या विभागात मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करणे आहे. या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मतदान शपथ देण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील प्रत्येक झोनमध्ये मतदान अधिकार रथ यात्रा काढण्यात आली, मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकीत बहुसदस्यीय निवडणूक प्रक्रियेत कसे मतदान करावयाचे, याबद्दल मतदारांना माहिती देण्यात आली. हा उपक्रम सर्व झोनमध्ये विविध भागांमध्ये येत्या ११ जानेवारीपर्यंत सतत सुरू राहणार आहे. यात मतदार अधिकार रथ यात्रेत शहरातील अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय, महाराष्ट्र पशु वैद्यकीय महाविद्यालय, पी डब्ल्यू एस महाविद्यालय, हिस्लॉप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मतदारांमध्ये जनजागृती केली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी डॉ.प्रभाकर टेम्भूर्णे, डॉ. नितीन कराळे, डॉ. मिलिंद घाटे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये जनजागृती केली.
लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमान नगर झोन, धंतोली झोन, नेहरू नगर झोन, गांधीबाग झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन, आशीनगर झोन, आणि मंगळवारी झोन मधील विविध वॉक विथ वोटर्स इन लो वोटर एरिया -मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. यात लक्ष्मीनगर झोनसाठी अर्चना लांडे, धरमपेठ झोनसाठी डॉ. अंकित पुसदकर, हनुमाननगर झोनमध्ये मतदान अधिकार रथ यात्रेचे समन्वयक म्हणून पूर्वेश फटिंग, धंतोली झोन साठी नितीन कराळे, नेहरूनगर झोनसाठी डॉ. संजय सिंगनजुडे, गांधीबाग झोनमध्ये डॉ. मिलिंद घाटे, सतरंजीपुरा झोनची जबाबदारी डॉ. मनोज मडावी, लकडगंज झोनमधील जबाबदारी डॉ. दिनेश कवाडे, आशीनगर झोनची जबाबदारी डॉ. रजनी हारोडे व मंगळवारी झोनमधील मतदान अधिकार रथ यात्रेच्या समन्वयकाची जबाबदारी डॉ. संध्या फटिंग यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. या मध्ये महिला महाविद्यालय, बिंझाणी महिला महाविद्यालय, श्री बिंझाणी सिटी कॉलेजसह विविध महाविध्यालयच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या प्रसंगी मनपाच्या राजेश मेश्राम, उज्वला चरडे, नूतन मोरे आणि इतर उपस्थित होते.

हनुमान नगर झोन अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांनी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन केले. त्यानंतर ही रॅली तिरंगा चौक सक्करदरा चौक या मार्गातून काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषवाक्य देत परिसर दणाणून सोडला. दरम्यान विद्यार्थ्यांना पथनाट्य सुद्धा केलेत. विद्यार्थ्यांची रॅली बघण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती ढोल ताशा पथक आणि मतदान जनजागृती करत आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या रॅलीत एकूण आठ महाविद्यालयांचा सहभाग होता.
महिला महाविद्यालय नंदनवन, वुमन्स आर्ट कॉमर्स कॉलेज नंदनवन, सिटी बिंझाणी, महाविद्यालय सक्करदरा, कमला नेहरू महाविद्यालय सक्रधरा, श्री निकेतन महाविद्यालय, मोहता सायन्स महाविद्यालय, प्रेरणा महाविद्यालय, भवभूती इंजिनिअरिंग कॉलेज इत्यादी महाविद्यालयांनी सहभाग दर्शविला. मतदान जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवून डॉ. रंजना लाडे स्वीप नोडल ऑफिसर महानगरपालिका नागपूर यांनी सुरुवात केली. याप्रसंगी डॉ. सुशांत चिमणकर, स्वीप समन्वयक अधिकारी मनपा नागपूर, डॉ. सोपानदेव पिसे संचालक राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जवळपास 600 विद्यार्थांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. रा से यो कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय सिंगनजुडे , डॉ. नितीन कराळे, डॉ. श्रीराम फरताडे,डॉ. अश्विनी दानव, डॉ. चंद्रशेखर गित्ते, डॉ. दिनेश कवाडे प्रियदर्शनी फार्मसी कॉलेज हिंगणा, डॉ. चंद्रकांत बावनकुळे, डॉ. अंकुश कंवर, डॉ.अर्चना गुप्ता,डॉ. मंजिरी पाठक, डॉ. मृणालिनी वलुकर यांच्या सहयोगाने भव्य रॅली चे आयोजन करण्यात आहे. रॅली चे समापन राष्ट्रगीताने करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना डॉ. सोपानदेव पिसे यांनी मतदानाचे महत्व पटवून दिले आणि समाजामध्ये मतदान जागृती करण्याचे आवाहन केले.




