spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विद्यार्थ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

 
कामठी, ता.१२ : रैयाराव मंगल प्रसाद तालुका कुरई जिल्हा शिवनी मध्यप्रदेशातील रहिवासी सोळा वर्षीय विद्यार्थ्याने वर्ग नऊच्या वार्षिक परीक्षेत नापास झाल्याने शेतात फवारणी करण्याचे विषारी  औषध प्राशन केल्याने प्रकृती गंभीर झालेल्या तरुणाचा कामठी येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारला सायंकाळी ६ वाजता सुमारास घडली असून पियुष विनय हिराकणे (१६) असे मृत्त तरुणाचे नाव आहे.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पियुष विनय हिराकणे (१६) रा  रैयाराव मंगल प्रसाद तालुका कुरई जिल्हा शिवनी मध्य प्रदेश हा विद्यार्थी वर्ग ९ च्या  वार्षिक परीक्षेत नापास झाल्याने  नेहमीच मानसिक तणावात राहत होता दिनांक ९ सप्टेंबर मंगळवारला सायंकाळी ६ वाजता सुमारास शेतात जाऊन शेतात फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने  त्याची प्रकृती खालावली घरच्यांना माहिती होताच गंभीर अवस्थेत त्याला कामठी येथील नागपूर मार्गावरील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता १० सप्टेंबर रोज बुधवारला सायंकाळी ६ वाजता सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला घटनेची माहिती नवीन कामठी पोलीस स्टेशनला मिळाली असता पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव घटनास्थळी रुग्णालयात जाऊन पंचनामा करून  प्रेत उत्तरीय तपासणी करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून नवीन कामठी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव करीत आहेत


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.