नागपूर १२ : गोंडखरी येथील नो-एन्ट्री पॉईंटवर एका वाहनास थांबविण्यात आले असता गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे आढळल्याने खळबळ उडाली.
वाहन क्रमांक UP 21 DT 3656 हे नो-एन्ट्रीकडे दुर्लक्ष करून वेगाने नागपूरच्या दिशेने जात होते. पोलिसांनी तत्काळ वाहन अडविले असता गाडीची नंबर प्लेट झाकलेली दिसली. त्यामुळे संशय आल्याने तपासणी करण्यात आली.
तपासात गाडीत सांड-बैल जातीची 70 जनावरे असल्याचे आढळले. वाहनचालकाने प्राथमिक चौकशीत सांगितले की ही जनावरे सागर येथून हैदराबादला घेऊन जात आहे. मात्र, त्याच्याकडे जनावरांच्या वाहतुकीसंबंधी कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत.
याप्रकरणी पुढील चौकशी सुरू असून वाहन व जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.




