Home Latest News विद्यार्थ्यांनो खा, प्या अन तंदुरुस्त रहा – डी शिवानंद

विद्यार्थ्यांनो खा, प्या अन तंदुरुस्त रहा – डी शिवानंद

0
206

 

– सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डी शिवानंद यांची धर्मराज शाळेला भेट. 

– चिमुकल्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद. 

– धर्मराज प्राथमिक शाळेतर्फे सत्कार. 

कन्हान :- विद्यार्थ्यांनी शालेय वयात खूप खाऊन पिऊन तंदुरुस्त रहावे व अभ्यासाकडे नियमितपणे लक्ष द्यावे, असे मौलीक मार्गदर्शन सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डी शिवानंद हयांनी केले.

धर्मराज शैक्षणिक परिसरात (दि.१५) त्यांनी धर्मराज प्राथमिक शाळा व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला. लहान मुलांमध्ये परमेश्वर असुन यांच्या आनंदात सहभागी होता येत असल्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. धर्मराज प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. हरिष पोटभरे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन रोटी फाऊंडेशनचे संस्थापक व सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डी शिवानंद उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणुन रोटी फाऊंडेशनचे समन्व यक सी. एम बगारीया, संजय सरकार, संजय पन्नासे, मुख्याध्यापक खिमेश बढिये, पर्यवेक्षक राजुसिंग राठोड उपस्थित होते. यावेळी धर्मराज प्राथमिक शाळे च्या वतीने मुख्याध्यापक खिमेश बढिये यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डी शिवानंद यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मंचावरील सर्व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रोटी फाऊंडेशन तर्फे सर्व विद्यार्थ्यांना चिक्की, कंपास बाॅक्स, बिस्किट चे वाटप करण्यात आले.

रोटी फाऊंडेशनच्या मदतीने गेल्या दोन वर्षां पासुन विद्यार्थ्यांना पूरक आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी प्रास्ताविकात नमुद करून रोटी फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार यशपाल गंगराज यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भिमराव शिंदेमे श्राम, गणेश खोब्रागडे, यशपाल गंगराज, शारदा समरीत,  अर्पणा बावनकुळे, पूजा धांडे, उत्तरा बन्सोड, माला मदनकर, सरीता बावनकुळे, सुषमा आरेकर, संजय साखरकर यांनी सहकार्य केले.