किशोर साहू ,मौदा, ता. १९:- गावातील शेतकरी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) यांच्यातील व्यवहाराची माहिती घेण्यासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE)कार्यक्रमांतर्गत नागपूर येथील कृषी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एपीएमसी मार्केटला मंगळवार (दि. 16 सप्टेंबर) ला भेट दिली. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी पुनम मानकर, प्राची लाडे, शुभांशी मानकर, शैलेजा मानवटकर, अश्लेषा मस्के, कृतीका महीसने सह मार्गदर्शक अधिकारीवर्ग उपस्थीत होते.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बाजारातील लिलाव पद्धती, दर ठरविण्याची प्रक्रिया, शेतकऱ्यांना मिळणारी सुविधा तसेच बाजारातील मध्यस्थांची भूमिका यांची प्रत्यक्ष माहिती मिळवली. शेतमाल खरेदी-विक्रीची कार्यप्रणाली, वजन काट्यांची तपासणी, तसेच शेतकऱ्यांना तात्पुरत्या साठवणुकीची सोय याविषयी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना बाजारव्यवस्थेबदल प्रत्यक्ष अनुभव घेता आला असून भविष्यात शेतक-यांना योग्य सल्ला देण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.




