नागपूर, ता २३ : नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अति आयुक्त वैष्णवी बी. आदेशान्वये व डॉ. रंजना लाड़े उपायुक्त समाज विकास विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहरातील रस्त्यांवर भिक्षा मागत असलेल्या भिक्षेकरीसाठी एक विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते की, रस्त्यांवर बेघर व निराश्रित अवस्थेत राहणाऱ्या भिक्षेकऱ्यांचा शोध घेऊन, त्यांना सुरक्षित निवारा व पुनर्वसनाची सुविधा पुरवणे.
ही शोध मोहीम लोकमत स्क्वेअर, बर्डी, सीताबर्डी उड्डानपुल आदी महत्त्वाच्या ठिकाणी राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान एकूण २२ भिक्षेकऱ्यांची नोंदणी करण्यात आली, त्यामध्ये:
१० पुरुष भिक्षेकरी
६ महिला भिक्षेकरी
६ बालक (मुले व मुली)/ २ अनाथ
या सर्व भिक्षेकऱ्यांचे नाव, वय, आरोग्यस्थिती, आणि पार्श्वभूमी यांचा विचार करून, त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. १० पुरुष भिक्षेकऱ्यांना नागपूरमधील “आस्था भिक्षेकरी पुनर्वसन निवारा गृह” घाट रोड येथे दाखल करण्यात आले.
६ महिला व बालके यांना “महिला बेघर निवारा सीताबर्डी ” येथे हलवण्यात आले.
यातील २ अनाथ लहान मुलांना विशेषतः “जिल्हा बाल संरक्षण पथक” द्वारे पुढ़ील करवाई करून बाल गृहात दाखल करून त्यांच्याकडे शैक्षणिक व मानसिक आरोग्य दृष्टीने काळजी घेण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मनपा समाज विकास विभाग, सीताबर्डी पोलिस स्टेशन आणि जिल्हा बाल संरक्षण पथक यांचे विशेष सहकार्य लाभले.




