– महाराष्ट्र आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थेच्या राज्याध्यक्षपदी किशोर वानखेडे यांची निवड
कन्हान :- महाराष्ट्रातील अनुदानित आदिवासी आश्रम शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला साथ देण्याचे आवाहन महाराष्ट्र आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थेचे नवनिर्वाचित राज्याध्यक्ष किशोर वानखेडे यांनी केले.
महाराष्ट्र आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थे च्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे सचिवालयातील जिमखाना सभागृहात नुकतीच पार पडली. या बैठकीत संस्थेच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संस्थेच्या समन्वयासाठी विभागनिहाय अध्यक्ष व नवीन राज्य कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अनुदानित आदिवासी आश्रम शाळांचे संचालन करताना येणाऱ्या अडचणी व सम स्यांच्या निराकरणासाठी अलीकडेच नागपूर येथे राज्य स्तरीय अधिवेशन घेण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विविध प्रश्न मांडण्यात आले होते. दरम्यान, आदिवासी आश्रमशाळांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन सर्व संबंधितांशी समन्वय साधण्यासाठी संस्थे च्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याच अनुषंगाने राजेंद्र सरोदे, किशोर वानखेडे, भगवानराव देशमुख व माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेच्या पार्श्वभूमी वर संस्थेचे माजी अध्यक्ष राजेंद्र सरोदे यांनी सरकार मधील वरिष्ठांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाची माहिती दिली. तसेच आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, आदिवासी विकास मंत्री आणि अनुदानित आश्रमशाळांच्या संचालकांनी मागील काळात दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष तथा माजी आमदार टेकचंद सावरकर यांनी संस्थेच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आमदार केवळराम काळे, माजी खासदार अनंतराव गुढे, राजेंद्र डांगे,माजी आमदार देवराम मुंढे, शिवराम झोळे, शेखर टेंगले आदींनी ही मार्गदर्शन केले. नवीन राज्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : – राज्याध्यक्ष – किशोर वानखेडे, कार्याध्यक्ष – माजी आमदार टेकचंद सावरकर, सरचिटणीस – नारायणराव श्रीमनवार, कोषाध्यक्ष – अशोकराव वानखेडे, राज्य उपाध्यक्ष – जितेंद्र नाईक, राजेंद्र डांगे, प्रशांत देवरे व देवराम मुंढे (माजी आमदार ), राज्य चिटणीस – डॉ. शशिकांत वाणी, दिलीप पेटकर, देविदास नागरे व बबलु हकीम, राज्य कार्यका रिणी सदस्य – मनोहर चटप, ॲड. मृणाल जोशी, नागेशमामा सावंत व सुभाष भांगरथ, राज्य मार्गदर्शक मंडळ – राजेंद्र सरोदे, भगवानराव देशमुख, आमदार डॉ. चंद्रकांत रघुवंशी, माजी खासदार अनंतराव गुढे, माजी आमदार शिवराम झोळे, उत्तमराव इंगळे, राजेश मुन, आ. केवळराम काळे, डॉ. शिरीषकुमार नाईक, युवराज पाटील, चामेश्वर महाणे, पोपटऱाव सोनवणे, राजेंद्र सोनवणे व गंपुजी घाटोळे, विभागीय अध्यक्ष : – ठाणे विभाग – नितीन प्रल्हादराव पाटील, अमरावती विभाग – प्रवीण दिगंबर पेटकर, नाशिक विभाग – मनोज हिरे, नागपुर विभाग – गजानन पाटोडे अशा पद्धतीने नवीन राज्य कार्यकारिणी गठित करून घोषित करण्यात आली. यावेळी आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष अशोकराव वानखेडे व उपाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी केले.
आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि आश्रमशाळांच्या विका सासाठी नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून राज्यभर संघटनात्मक कार्याला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






