spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सूरज येवले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती

– आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्याची दखल; नियुक्तीनिमित्त मान्यवरांकडून सत्कार व शुभेच्छांचा वर्षाव

नागपूर :- आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले सूरजभाऊ येवले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूरज येवले यांनी आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, जनतेचे हक्क आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले आहे. सामाजिक कार्याची ही पार्श्वभूमी लक्षात घेता काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर प्रदेश सचिवपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना येवले म्हणाले,“देशातील हुकूमशाहीच्या विरोधात जनतेला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी तसेच सत्ता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्याच्या उद्देशाने आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाचे नेते निवडून आणण्यासाठी भक्कम मेहनत करू जनतेला न्याय मिळवून देतानाच त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू,”अशी भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेस पक्षाने सोपविलेल्या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा आणि संघटनात्मक कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सामाजिक क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सूरज येवले यांच्या नियुक्तीनिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी गिरीश पांडव, दिनेश तराळे, संजय शिंदे, चक्रधर बोढारे, सुरेश उके, राजीव माहूरे, निरंजन जांभुळे, विनय जगताप, रोहित बोरकर, हिमांशू सहारे, विकास नारायणे आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. उपस्थितांनी त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत आगामी काळात त्यांच्या माध्यमातून सामाजिक आणि संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. सूरज येवले यांच्या नियुक्तीचे त्यांच्या सहकाऱ्यांनी, समर्थकांनी तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून, त्यांच्या नव्या जबाबदारीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.