spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सूर्यकुमार यादवने आपले मानधन लष्कराला दिले, संजय राऊतांनी शेतकऱ्यांना कवडी तरी दिली का

– भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा हल्लाबोल

मुंबई :- भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानला दारुण हार पत्करावी लागल्याने खा. संजय राऊत यांना सट्ट्यात अतोनात नुकसान झेलावे लागले. त्यांचा डीएनए हा भारताचा नाही तर पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानचीच भाषा राऊतांच्या तोंडी असते अशी प्रखर टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आशिया चषक स्पर्धेचा अंतीम सामना 100 कोटी भारतीयांनी बघून पाकिस्तानचे प्रवक्ते राऊत यांचे तोंड काळे केले असा हल्लाबोलही त्यांनी केला. सामना जिंकल्यावर क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांनी मानधन सशस्त्र दलांना अर्पण केले हे अत्यंत कौतुकास्पद आहे. मात्र राऊत यांनी एक दिवसाचे मानधनही पूरग्रस्त शेतक-यांना दिले का असा सवाल बन यांनी केला.

अतिवृष्टीमुळे राज्यात अतोनात नुकसान झाले आहे. होते नव्हते ते सर्व वाहून गेले. मात्र भाजपा – महायुती सरकार खंबीरपणे पाठीशी उभे असून तात्काळ मदत करत आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ 100 टक्के मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे सर्वाधिकार दिले असून निधीची तरतूद केली आहे. ज्यांची जमीन वाहून गेली, पिकाचे नुकसान झाले, घरे वाहून गेली, घरांची पडझड झाली, फळबागा वाहून गेल्या, जीवीतहानी झाली, जनावरे वाहून गेली त्यांना वेगळी मदत मिळत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या इंच-इंच जमिनीची नुकसानभरपाई मिळणार आहे. फुकटच्या बाता मारणा-या संवेदनशून्य राऊत आणि उबाठा गटाने एक पैसाही शेतकऱ्यांना देऊ केलेला नाही, अशा शब्दांत बन यांनी संजय राऊतांना लक्ष्य केले.

राऊत ही महाराष्ट्रासाठी आपत्ती

अतिवृष्टीने राज्यात कहर केला असताना आपत्ती व्यवस्थापन उत्कृष्टपणे हाताळून तात्काळ शेतक-यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी भाजपा महायुती सरकार प्रयत्नशील आहे. मंत्री गिरीश महाजन हे जमीनीवर उतरून पाहणी करत आहेत. राऊतांना साधे एसी कारमधून उतरून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकाव्या असे वाटले नाही. ते सुका मेव्यावर ताव मारत बसले आहेत. संजय राऊत ही महाराष्ट्रासाठी आपत्तीच आहे, असे बन म्हणाले.

राहुल गांधी अराजक माजवतात

राहुल गांधींना नेपाळसारखी अराजकता भारतात हवी आहे. त्यासाठी माथी भडकावण्याचे हीन राजकारण ते करत आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणाऱ्या आपल्या देशात काँग्रेसचा तरुण पिढीला (gen-z )ला भडकावून आंदोलनाचा कुटील डाव उधळून लावला आहे या शब्दांत बन यांनी टीकास्त्र सोडले. सध्याची तरुण पिढी ही भारतीयत्वाला समर्पित अभाविपच्या विचारांना साथ देत आहे. राहुल गांधी परदेशात जाऊन देशद्रोही वक्तव्ये करतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशाची मान जगभरात उंचावण्याचे काम करतात. जनता ही मोदींच्या सोबत खंबीरपणे उभी आहे, असे बन म्हणाले.

Popular Articles